शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

निर्यातक्षम द्राक्षांचे दर उतरले

By admin | Updated: April 17, 2017 02:53 IST

निर्यातक्षम द्राक्षांचे क्षेत्र यंदा दुपटीने वाढल्यामुळे युरोपीयन राष्ट्रांत द्राक्षांचे दर चार किलोच्या पेटीला ८० ते १०० रुपयांनी उतरले आहेत.

अशोक डोंबाळे , सांगलीनिर्यातक्षम द्राक्षांचे क्षेत्र यंदा दुपटीने वाढल्यामुळे युरोपीयन राष्ट्रांत द्राक्षांचे दर चार किलोच्या पेटीला ८० ते १०० रुपयांनी उतरले आहेत. त्यातच तापमान वाढल्यामुळे द्राक्षमणी मऊ पडत असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.समाधानकारक पाऊस आणि वातावरणही चांगले राहिल्यामुळे जिल्ह्यात १,५७५ शेतकऱ्यांनी ८७०.५६ हेक्टरवर निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन घेतले. गतवर्षीपेक्षा यंदा द्राक्षे निर्यातीत दुप्पट वाढ झाली आहे. जिल्ह्यात सध्या तीनशे हेक्टर क्षेत्रातील द्राक्षे शिल्लक आहेत.यंदा द्राक्षाची निर्यात उशिराच सुरू झाली. चांगला पाऊस आणि वातावरणही पोषक असल्यामुळे शेतकऱ्यांनी निर्यातक्षम द्राक्षे मोठ्या प्रमाणात केली. जिल्ह्यात ३०० ते ५०० हेक्टर क्षेत्रावर असणारे निर्यातक्षम द्राक्षांचे क्षेत्र २०१६-१७ मध्ये ८७०.६५ हेक्टरवर पोहोचले. आतापर्यंत ८४६ शेतकऱ्यांची ६५५.२९ हेक्टर क्षेत्रातील ८७३४.७५ टन द्राक्षे ६७० कंटेनरमधून १९ राष्ट्रांत निर्यात झाली आहेत. अजून २१४.६१ हेक्टर क्षेत्रातील द्राक्षे निर्यात करण्याची शिल्लक आहेत. द्राक्षघडांची तोड केल्यानंतर निर्यातीपूर्वी ती शीतगृहामध्ये ठेवावी लागतात. सध्याच्या तापमानामध्ये तापलेली द्राक्षे शीतगृहात ठेवल्यानंतर काळी पडत आहेत. तसेच भारतातून युरोपीयन राष्ट्रांत द्राक्षे पोहोचण्यास जास्त कालावधी लागत असल्यामुळे मऊ पडलेली द्राक्षे टिकत नाहीत. युरोपीयन राष्ट्रांमध्ये २५ मार्चपर्यंतच द्राक्षाला जास्त मागणी असते. त्यानंतर फारशी मागणी नसते. त्यामुळे दर उतरले असल्याचे निर्यातदार व्यापाऱ्यांनी सांगितले.