शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

‘आयएम’ला स्फोटके पुरविणारे गजाआड

By admin | Updated: March 31, 2015 03:56 IST

: इंडियन मुजाहिददीनला बॉम्बस्फोट घडविण्यासाठी आवश्यक तो स्फोटकांचा साठा पुरविणाऱ्या दोन अतिरेक्यांना राज्य दहशतवादविरोधी पथकाने(एटीएस) अटक केली

मुंबई : इंडियन मुजाहिददीनला बॉम्बस्फोट घडविण्यासाठी आवश्यक तो स्फोटकांचा साठा पुरविणाऱ्या दोन अतिरेक्यांना राज्य दहशतवादविरोधी पथकाने(एटीएस) अटक केली . डॉ. सय्यद इस्माईल अफाक अलीम लंका(३६), सददाम हुसेन फिरोज खान(२८) अशी या अतिरेक्यांची नावे आहेत. या दोघांनी पुरविलेल्या स्फोटकांचा वापर इंडियन मुजाहिददीनने मुंबईतल्या १३/७ आणि पुण्याच्या जर्मन बेकरी, जंगली महाराज रोडवरील बॉम्बस्फोटात केल्याचा दाट संशयआहे.जानेवारीच्या पहिल्या आठवडयात बंगळुरू पोलिसांनी एका गुन्हयात या दोघांना कर्नाटकच्या भटकळ गावातून अटक केली होती. चौकशीत या दोघांचे इंडियन मुजाहिददीनच्या अहमद जरार सिद्धिबाप्पा उर्फ यासीन भटकळ, अख्तर हुसेन उर्फ हडडी आणि जीया उर रेहमान उर्फ वकास यांच्या संपर्कात होते, अशी माहिती मिळताच बंगळुरू पोलिसांनी दहशतवादाच्या दृष्टीकोनातून या दोघांची कसून चौकशी केली. त्यानंतर एटीएसने या दोघांचा ताबा घेत त्यांना मुंबईत आणले. या दोघांना १३ जुलै २०११ रोजी मुंबईतल्या झवेरी बाजार, आॅपेरा हाऊस, दादर येथे घडलेल्या तिहेरी बॉम्बस्फोटांच्या गुन्हयात अटक केली. लंका, खान यांनी पुरविलेल्या स्फोटकांच्या आधारेच मुजाहिददीनने मुंबईत बॉम्ब तयार केले आणि ते या तीन ठिकाणी पेरले. एटीएसचे प्रमुख हिमांशू रॉय यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार अटक आरोपींनी याआधी अनेकदा इंडियन मुजाहिददीनला स्फोटके पुरविलेली आहेत. महाराष्ट्रातील इंडियन मुजाहिददीनच्या बहुतांश सर्वच कारवायांमध्ये या दोघांचा सहभाग असावा, असा संशय आहे. मंगळवारीया दोघांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मागितली जाईल. पोलीस कोठडीत या दोघांकडे त्यासंबंधी कसून चौकशी केली जाईल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे दोघे आयएमच्या संपर्कात कसे आले, कधीपासून आहेत, यांनी कितीवेळा कोणती स्फोटके आयएमला पुरवली, त्याचा वापर कोणत्या स्फोटांमध्ये झाला, स्फोटकांच्या बदल्यात त्यांना आयएमने काय दिले, आयएम व्यतिरिक्त अन्य कोणत्या दहशतवादी संघटनांच्या संपर्कात होते, आहेत या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी लंका व खान यांची एटीएस कसून चौकशी करणार आहे.