शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
5
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
6
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
7
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
8
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
9
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
10
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
11
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
12
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
13
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
14
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
15
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
16
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
17
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
18
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
19
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
20
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम

साखर कारखान्यात स्फोट

By admin | Updated: April 7, 2016 02:22 IST

येथील डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील सहकारी साखर कारखान्यातील स्फोटात मळीची टाकी (मोलॅसेस टँक) फुटून तीन कामगारांचा मृत्यू झाला, तर अन्य नऊ जण जखमी झाले.

लोणी (जि. अहमदनगर) : येथील डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील सहकारी साखर कारखान्यातील स्फोटात मळीची टाकी (मोलॅसेस टँक) फुटून तीन कामगारांचा मृत्यू झाला, तर अन्य नऊ जण जखमी झाले. बुधवारी सकाळी ही घटना घडली. टँकला लागलेली गळती दुरुस्त करण्याचे काम सुरू असतानाच हा स्फोट झाला. मळीची टाकी गळायला लागल्याने ती दुरुस्त करण्याचे काम कारखान्यातील केमिस्ट, वेल्डर आणि इतर कामगार हाती घेणार होते. त्याची पाहणी करीत असतानाच टाकीत स्फोट झाला. घटनास्थळावरील कामगार दूर फेकले गेले. त्यात विनोद दादा जोंधळे ( ६०, रा. निमगाव जाळी), बाळू संपत देवरे (५६, रा. लोणी, दोघेही केमिस्ट) तर सहायक शशिकांत पगारे (५२, रा. लोणी) यांचा मृत्यू झाला. इतर ९ कामगार जखमी झाले. जखमींना तातडीने प्रवरा मेडिकल ट्रस्टमध्ये दाखल करण्यात आले. जखमींपैकी विजय हरिभाऊ चेचरे, शेख शकील अजीम यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.माहिती मिळताच कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे यांनी रुग्णालयात धाव घेतली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हेही तातडीने लोणीकडे रवाना झाले. (प्रतिनिधी)> जखमींची नावेरामदास चिमा पवार, मोहन जिजाबा वदक, राजेश मकासरे, नवनाथ अण्णासाहेब विखे, निलेश चांगदेव धावणे, संदीप काशीनाथ देवकर, दामोधर माधव घाडगे हे कामगार दुर्घटनेत जखमी झाले. त्यांना मदत करताना इतर सहा जण किरकोळ जखमी झाले.