शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

शोषण करणाऱ्या बाबाचा पर्दाफाश

By admin | Updated: August 31, 2015 01:07 IST

‘करणी झाली आहे,’ असे महिलांना सांगून भस्माचे उपचार करण्याच्या बहाण्याने विवस्त्र करणाऱ्या तसेच लॉजवर नेऊन अत्याचार करणाऱ्या सहकारनगरमधील भोंदूबाबाचे स्टिंग

दीपक जाधव, पुणे‘करणी झाली आहे,’ असे महिलांना सांगून भस्माचे उपचार करण्याच्या बहाण्याने विवस्त्र करणाऱ्या तसेच लॉजवर नेऊन अत्याचार करणाऱ्या सहकारनगरमधील भोंदूबाबाचे स्टिंग आॅपरेशन करून एका कुटुंबाने त्याला रंगेहाथ पकडून दिले. दोन तासांच्या थरारक पाठलागानंतर या भोंदूबाबाला जेरबंद करण्यात आले.सहकारनगरमध्ये नामनाथ बाबा म्हणून ओळख असलेल्या या बाबाचे खरे नाव पांडुरंग लक्ष्मण साळवी (७५) असे आहे. इंदिरानगर येथे राहणाऱ्या एका कुटुंबाने नामनाथ बाबाला गुरू केले होते. दोन वर्षांपासून ते त्याची मनोभावे सेवा करीत होते.गुरुपौर्णिमेनिमित्त त्या बाबाच्या दर्शनाला घरातील नवविवाहित सून गेली असता त्याने ‘तुझ्यावर सासूने करणी केली आहे, तुझे त्रासदूर करायचे असतील तर भस्माचे उपचार घ्यावे लागतील’, असे सांगितले. आणि तिला एकटीला बोलावून तिच्या शरीराला भस्म लावले. रविवारी सकाळीही त्याने तिला फोन करून भस्म लावण्यासाठी एकटी घरी ये, असे सांगितले. तेव्हा तिने नवरा, सासू, सासरे यांना विश्वासात घेऊन घडल्या प्रकाराची कल्पना दिली.त्यानंतर सून बाबाच्या घरी पोहचली, त्या वेळी त्याने घरात खूप गर्दी आहे, आपण बाहेर जाऊ, असे सांगितले आणि तिला दुचाकीवर बसवून बाहेर घेऊन जाऊ लागला. त्या वेळी त्याच्या घराजवळ लपून बसलेल्या सुनेच्या घरच्यांनी त्यांचा रिक्षातून पाठलाग सुरू केला. मंडई येथील एका लॉजवर तो सुनेला घेऊन गेला, तिथे रूम घेत असतानाच सुनेच्या नातेवाइकांनी त्याची गचांडी धरून रंगेहाथ पकडले. त्यानंतर मंडई चौकीत त्याला पोलिसांच्या त्ााब्यात देण्यात आले. गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशीरपर्यंत सुरू होते.