नाशिक : मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमार्इंड झकी-उर रहमान लख्वीला जामिनावर मुक्त करून दुसऱ्या एका गुन्ह्यात ताब्यात घेण्याची पाकिस्तान सरकार व तेथील उच्च न्यायालयाची कार्यवाही म्हणजे ढोंगीपणा असल्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे.‘लोकमत’शी बोलताना निकम म्हणाले की, लख्वी प्रकरणी भारताने नापसंती व्यक्त केल्यामुळे आपण तुरुंगातून बाहेर पडू नये यासाठी बेकायदेशीरपणे स्थानबद्धतेचा आदेश काढण्यात आल्याचा आरोप लख्वीने पाक उच्च न्यायालयात केला आहे़ यामध्ये लख्वीची चूक नाही कारण, या दाव्याला विरोध करण्यासाठी पाकिस्तान सरकारतर्फे कोणीही न्यायालयात हजर नव्हते़ लख्वीच्या आरोपात तथ्य आढळल्यानेच न्यायालयाने स्थानबद्धतेच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली़न्यायालयाच्या आदेशामुळे लख्वी केव्हाही तुरुंगाच्या बाहेर पडू शकतो आणि एकदा तो जामिनावर मुक्त झाला की, त्याचा जामीन रद्द करणे अवघड असते, असे निकम म्हणाले. भारत सरकारने पाकिस्तानच्या ढोंगीपणाबाबत एक अधिकृत शिष्टमंडळ तयार करून प्रगत राष्ट्रांच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे़अतिरेकी कसाबला फाशी दिल्यानंतर पाकिस्तानच्या आमंत्रणावरून भारत सरकारच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत मी इस्लामाबादला गेलो होतो़ तेव्हा कसाब व त्याच्या साथीदारांनी १६६ नागरिकांना ठार मारले व त्या कटामागे लख्वी असल्याचे मी सांगितले होते़ पाक सरकारने लख्वीविरुद्ध कट रचून १६६ लोकांना ठार केल्याचा आरोप का ठेवला नाही, याची विचारणा केली असता त्यांनीही चूक कबूल केली. मात्र आरोप ठेवला नाही़ (प्रतिनिधी)च्सरकारला वकिलांच्या न्यायालयावरील बहिष्काराबद्दल माहिती होते, मग त्यांनी जामीन अर्ज का तहकूब केले नाही ? च्सरकारी वकील न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार कसा टाकू शकतो? च्सरकारने तातडीने नवा वकील का नियुक्त केला नाही ? च्लख्वीच्याविरुद्ध सबळ पुरेसे पुरावे नसल्याचे दहशतवादी न्यायालय म्हणते, मग लख्वी पाच वर्षे तुरुंगात कसा राहिला? च्कसाबचा कबुली जबाब नोंदविणारे मुंबईतील न्यायदंडाधिकारी, पोलीस अधिकारी व दोन डॉक्टरांची साक्ष पाकच्या न्याय आयोगाने का नोंदविली? च्लख्वीच्या वकिलाने मुंबईत साक्षीदारांची उलटतपासणी का घेतली?
लख्वीच्या जामिनामुळे पाकचा ढोंगीपणा उघड
By admin | Updated: December 31, 2014 01:51 IST