शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसनाबाबत भूमिका स्पष्ट करा

By admin | Updated: June 6, 2017 05:50 IST

पारसिक बोगद्याच्या आजूबाजूला असलेल्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पारसिक बोगद्याच्या आजूबाजूला असलेल्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने पुढील आठवड्यात राज्य सरकारला याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. ‘हे अगदी गंभीर आणि महत्त्वाचे प्रकरण आहे. पावसाळ्यात भूस्खलन झाले झोपडपट्टीवासीयांसोबतच रेल्वे प्रवाशांच्या जिवालाही धोका निर्माण होईल. त्यामुळे झोपडपट्ट्या तातडीने हटवणे गरजेचे आहे,’ असे न्या. अभय ओक व न्या. विभा कंकणवाडी यांच्या खंडपीठाने म्हटले. उच्च न्यायालयाने जुलै २०१६ मध्ये पारसिक बोगद्याच्या आजूबाजूच्या झोपड्या हटविण्यास स्थगिती दिली होती. ही स्थगिती हटविण्यात यावी, यासाठी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. गेल्या जून महिन्यात ठाणे महापालिकेने पारसिक बोगद्याच्या जवळील सुमारे २०० झोपडपट्ट्यांना नोटीस बजावली होती. तिला येथील रहिवाशांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेच्या सुनावणीवेळीच उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेला काहीही कारवाई न करण्याचे अंतरिम निर्देश दिले होते. १३ जूनपर्यंतची वेळठाणे महापालिकेने नोटीस बजावलेल्या काही झोपड्या ठाणे महापालिकेच्या अधिकारक्षेत्रात येतात, तर काही राज्य सरकारच्या वनविभागाच्या अखत्यारीत येतात. ठाणे महापालिकेने त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, राज्य सरकारने अद्याप भूमिका स्पष्ट न केल्याने, सोमवारी खंडपीठाने राज्य सरकारला १३ जूनपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.