मुंबई : नदी व खाडीजवळील बांधकामांना परवानगी देण्याबाबतचे धोरण काय आहे, याचे स्पष्टीकरण देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले आहेत.
या प्रकरणी वनशक्ती या सामाजिक संघटनेने जनहित याचिका दाखल केली आहे. नदी व खाडीजवळ बांधकाम केल्याने पुराचा धोका असून ते पर्यावरणास हानिकारक आहे. त्यामुळे नदी व खाडीपासून शंभर मीटर्पयत बांधकामास परवानगी देऊ नये, अशी मागणी याचिकेत केली आहे. न्या. व्ही. एम. कानडे व न्या. प्रमोद कोदे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने वरील आदेश देऊन ही सुनावणी तहकूब केली. (प्रतिनिधी)