शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी संस्थांमध्ये अधिकाऱ्यांऐवजी तज्ज्ञ

By admin | Updated: February 24, 2016 02:17 IST

राज्य शासनाचे भागभांडवल असलेल्या सहकारी संस्थांमध्ये दोन शासकीय अधिकाऱ्यांऐवजी एक अधिकारी आणि एक तज्ज्ञ संचालक नेमण्यास राज्य मंत्री परिषदेने मान्यता दिली.

मुंबई : राज्य शासनाचे भागभांडवल असलेल्या सहकारी संस्थांमध्ये दोन शासकीय अधिकाऱ्यांऐवजी एक अधिकारी आणि एक तज्ज्ञ संचालक नेमण्यास राज्य मंत्री परिषदेने मान्यता दिली. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमामध्ये सुधारणा करणारा अध्यादेश गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये काढण्यात आला होता. त्या बाबतचे विधेयक मागे घेऊन काही सुधारणांसह अध्यादेश पुन्हा काढण्यास मान्यता देण्यात आली. मंत्रिपरिषदेने मान्य केलेल्या सुधारणेनुसार शासनाचे भागभाडंवल असलेल्या सहकारी संस्थांमध्ये शासनाने नामनिर्देशीत केलेले दोन प्रतिनिधी असतील. त्यातील एक प्रतिनिधी सहाय्यक निबंधक या पदापेक्षा कमी दर्जाचा नसेल, तर दुसरा प्रतिनिधी संस्थेच्या कामकाजाबाबत अनुभव असणारा राहील. अकरा संचालक असणाऱ्या सहकारी संस्थांमध्ये एक कर्मचारी प्रतिनिधी आणि सतरा सदस्यीय संचालक मंडळात दोन कर्मचारी सदस्य असतील. ज्या सहकारी संस्थेत २५ अथवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी वेतनावर कार्यरत असतील, त्यातील कोणत्या संस्थांना संबंधित तुरतुदीतून सूट द्यायची हे वेळोवेळी आदेश काढून ठरविले जाणार आहे. सहकारी संस्थांच्या संचालक मंडळावर कर्मचाऱ्यांना प्रतिनिधित्व मिळण्यासाठी शासनाने वरील बदल केलेले आहेत. (विशेष प्रतिनिधी)राज्य शासनाच्या खरेदी धोरणात बदलराज्य शासनाने गेल्यावर्षी शासकीय खरेदीसाठीचे धोरण निश्चित केले होते. त्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजना व सबला योजनेंतर्गत लाभार्र्थींना घरपोच आहार पुरविण्यासाठी निविदा मागविण्याच्या पद्धतीत बदल करण्यास राज्य मंत्री परिषदेने मान्यता दिली. या खरेदीसाठी स्पर्धात्मक निविदा न मागविता आधी अभिव्यक्ती स्वारस्य पध्दतीने (एक्स्प्रेशन आॅफ इंटरेस्ट) ई-निविदा मागविण्याचा निर्णय घेण्यात आला. या बदलामुळे सरकारने निश्चित केलेले दरच निविदादारांना नमूद करावे लागतील. सरकारच्या नव्या खरेदी धोरणात ही तरतूद करायची राहून गेली होती. ती चूक आज दुरुस्त करण्यात आली. मुद्रांक अधिनियमामध्ये सुधारणा करण्यास मान्यताविविध प्रकारच्या दस्तांवर आकारण्यात येणारे मुद्रांक शुल्क आता फ्रॅकिंग तसेच ई-पेमेंटद्वारे ग्रास प्रणालीमार्फत आवश्यक तेवढचे भरण्याची सोय उपलब्ध असल्याने आता नागरिकांना योग्य तेवढेच मुद्रांक शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.