शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

तज्ज्ञ डॉक्टरांचा दुष्काळ : स्त्री रूग्णालयाचा प्रश्न रखडलेला, आरोग्य केंद्रेही आजारी

By admin | Updated: July 2, 2014 00:35 IST

तब्बल सोळा वर्षाच्या कालखंडात ‘योग्य उपचार’ न झाल्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे.

वाशिम: एक दोन नव्हे तर तब्बल सोळा वर्षाच्या कालखंडात ह्ययोग्य उपचारह्ण न झाल्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे. बहुतांश आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांची पदे रिक्त आहेत. औषधांचा प्रचंड तुटवडा आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयाबाबत तर न बोललेलेच बरे. जिल्ह्याच्या निर्मितीनंतरही येथे उपजिल्हा रुग्णालयाचा पॅटर्नच कार्यरत आहे. तज्ज्ञ डॉक्टर नाहीत, आहेत ते डॉक्टर कसे तरी जगन्नाथाच्या रथाप्रमाणे रूग्णालयाचा गाडा ओढत आहेत. अद्ययावत यंत्रसामग्री व तज्ज्ञ डॉक्टरांच्या कमतरतेमुळे रुग्णांच्या माथ्यावर ह्यरेफर टू अकोलाह्ण असाच शेरा मारला जातो.जिल्हा निर्मितीपूर्वी वाशिम येथे उपजिल्हा रुग्णालय कार्यरत होते. यामध्ये १00 खाटांची व्यवस्था होती. सन १९९८ ला वाशिम जिल्ह्याची नव्याने निर्मिती झाली, तेव्हा जिल्हावासियांना आरोग्य सेवा पुरविण्यात उपजिल्हा रुग्णालय कुचकामी ठरू लागले होते. सोबतच अकोला येथून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा कारभार पाहणे जिकिरीचे ठरू लागले होते. २00१ मध्ये शासनाने जिल्हा शल्यचिकित्सकांची नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून वाशिमच्या उपजिल्हा रुग्णालयाचे रूपांतर जिल्हा रुग्णालयात झाले. जिल्हा रुग्णालय झाले असले तरी पॅटर्न मात्र उपजिल्हा रुग्णालयाचाच कायम ठेवण्यात आला होता. खाटांची पूर्वी एवढीच, १00 ठेवण्यात आली. कर्मचार्‍यांची संख्याही त्याच पॅटर्ननुसार ठेवण्यात आली. आवश्यक यंत्रसामग्री तथा सोयी-सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. रुग्णालयात ट्रामा सेंटर नाही, व्हेंटिलेटर नाही, सिटीस्कॅन नाही. याशिवाय इतरही आवश्यक यंत्रसामग्री व तज्ज्ञांचा अभाव आहे. त्यामुळे गंभीर रूग्णांना पुढील उपचारासाठी अकोल्याला पाठविण्यात येते. विशेषत: गर्भवती महिलांची आरोग्य सेवेअभावी कुचंबना होत आहे.