शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासक्रमातील विज्ञानाचे प्रयोग मोबाईल अ‍ॅपमध्ये

By admin | Updated: July 10, 2016 22:37 IST

गणिताप्रमाणेच विज्ञानाचे विषय विद्यार्थ्यांना कठीण वाटतात. त्यामुळेच हे विषय समजण्यासाठी प्रत्यक्ष प्रयोगाची जोड दिली आहे.

वर्ग १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना लाभ : जिज्ञासा रिसर्च फाऊंडेशनचा उपक्रमनागपूर : गणिताप्रमाणेच विज्ञानाचे विषय विद्यार्थ्यांना कठीण वाटतात. त्यामुळेच हे विषय समजण्यासाठी प्रत्यक्ष प्रयोगाची जोड दिली आहे. मात्र शाळेच्या काळात केलेले प्रयोग ऐन परीक्षेच्या वेळी आठवले जात नसल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ होते. अशावेळी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी विज्ञानाच्या प्रयोगांचे मोबाईल अ‍ॅप कामी येणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रयोगशाळेत केलेल्या प्रयोगाचे व्हिडिओ या अ‍ॅपमध्ये अपलोड केले असून, विद्यार्थी कोणत्याही वेळी या प्रयोगांची उजळणी करू शकतील.शहरातील जिज्ञासा रिसर्च अ‍ॅन्ड डेव्हलपमेंट सोसायटी या संस्थेने हे अ‍ॅप्लीकेशन तयार केले आहे. सोसायटीचे अध्यक्ष मनीष करंदीकर यांनी सांगितले की, यू-ट्यूबवर अशाप्रकारे विज्ञानाचे प्रयोग उपलब्ध आहेत. मात्र ते सर्व विदेशातील शाळांमधील असून विद्यार्थ्यांना ते कळायला कठीण आहेत. त्यामुळे येथीलच विद्यार्थ्यांनी केलेले प्रयोग अपलोड करण्याचा विचार संस्थेने केला. राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमातील प्रयोगाचे छोटे छोटे व्हिडिओ तयार करून ह्यप्रयोग १०ह्ण हे अ‍ॅप निर्माण करण्यात आले. यात दहावीच्या विज्ञान विषयाच्या अभ्यासक्रमातील १५ प्रयोगांचा समावेश आहे. प्रयोगांच्या व्हिडिओसोबत विद्यार्थ्यांनीच लिहिलेली प्रयोगाची संपूर्ण माहितीही या अ‍ॅपमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांच्या परवानगीनंतर हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरमध्ये अपलोड करून सर्वांसाठी उपलब्ध केल्याचे करंदीकर यांनी सांगितले. गुगल प्ले स्टोअरवर इबीओएम (इलेक्ट्रॉनिक्स ब्राऊचर आॅन मोबाईल) प्रयोग १० असे सर्च केल्यास हे अ‍ॅप सहज डाऊनलोड करता येईल. बदलत्या अभ्यासक्रमानुसार नवीन प्रयोग अपडेट करण्याची सोय या अ‍ॅपमध्ये असल्याचा दावाही करंदीकर यांनी केला.