शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

सहस्रबुद्धे यांचा अनुभव उपयुक्त ठरेल - मुख्यमंत्री

By admin | Updated: September 19, 2016 01:47 IST

खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी संस्थात्मक व देशाच्या जडणघडणीसाठी महत्त्वाचे बौद्धिक योगदान दिले आहे.

मुंबई : खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी संस्थात्मक व देशाच्या जडणघडणीसाठी महत्त्वाचे बौद्धिक योगदान दिले आहे. त्यांची राज्यसभेवर नियुक्ती झाल्याने ज्ञानाच्या क्षेत्रातील धोरणनिर्मितीत त्यांच्या कार्याचा व अनुभवाचा निश्चित उपयोग होईल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. वांद्रे येथील एमआयजी क्रिकेट क्लब येथे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने आयोजित खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या सत्कार समारंभात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. प्रबोधिनीच्या व्यवस्थापन समितीचे कोषाध्यक्ष प्रतापभाई आशर, सदस्य अरविंदराव रेगे आदी मान्यवर उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, डॉ. सहस्रबुद्धे यांनी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या माध्यमातून अनेक चांगले कार्यकर्ते, नेते निर्माण केले. प्रबोधिनीत विविध विषयांवर संशोधन आणि प्रशिक्षणांचे आयोजन करून कार्यकर्ते आणि नेत्यांची बौद्धिक फळी निर्माण करण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा उपयोग धोरणनिर्मितीसाठी निश्चित होईल. प्रबोधिनीच्या वतीने विविध प्रशिक्षणांचे आयोजन व संशोधन प्रकल्प राबवून समाजाची बौद्धिक संपदा वाढविण्यासाठी योगदान दिले जात आहे. या संस्थेचा माझ्या जडणघडणीत मोठा वाटा आहे, अशी भावना सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केली.