शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या खर्चाने चला तीर्थयात्रेला !

By admin | Updated: September 24, 2016 04:18 IST

सरकारी खर्चाने तीर्थयात्रेला जाण्याची योजना आता महाराष्ट्रात येऊ घातली आहे.

यदु जोशी,

मुंबई- सरकारी खर्चाने तीर्थयात्रेला जाण्याची योजना आता महाराष्ट्रात येऊ घातली आहे. ‘मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजनें’तर्गत ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकास त्याच्या हयातीत एकदा देशातील कुठल्याही एका तीर्थक्षेत्राचे दर्शन घेण्यासाठी जाता येईल.या योजनेचे स्वरूप निश्चित करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. दोन महिन्यांत तिची अंमलबजावणी होईल, असे सूत्रांनी सांगितले. यानिमित्ताने फडणवीस हे ज्येष्ठ नागरिकांसाठी एक प्रकारे श्रावणबाळाची भूमिका स्वीकारणार आहेत. या योजनेत सर्वधर्मीय प्रमुख तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात येणार आहे. मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ही योजना आधीच अंमलात आणली आहे. काही बदल करून तोच पॅटर्न महाराष्ट्रात लागू होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशात तीर्थक्षेत्राला जाण्यायेण्याचा, तेथे राहण्याचा आणि भोजनाचा खर्च तेथील शासन उचलते. त्यासाठी त्यांनी इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टूूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडशी करार केला आहे. महाराष्ट्रातही आयआरटीसीशीच करार केला जाण्याची शक्यता आहे. निश्चित करून दिलेल्या सुविधांव्यतिरिक्त काही सुविधा हव्या असतील तर त्यासाठी यात्रेकरूंना पैसे मोजावे लागतील. >तीर्थयात्रेसाठी आधी नोंदणी करावी लागेलया योजनेंतर्गत दरवर्षी ५० हजार ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रेला पाठविण्यात येईल. आयकर न भरणाऱ्या सर्वच ज्येष्ठ नागरिकांचा समावेश या योजनेत करण्याचा विचार आहे. तीर्थयात्रेसाठी आधी नोंदणी करावी लागेल. तहसील कार्यालय आणि अन्य काही शासकीय कार्यालयांमध्ये त्यासाठीचे अर्ज मिळतील. आॅनलाइन नोंदणीचीही सोय असेल.ज्येष्ठ नागरिकांना गट तयार करूनही अर्ज करता येईल. एका गटात किमान २५ सदस्य असावेत, अशी अट असेल. तीर्थयात्रींची निवड लॉटरी पद्धतीने होईल.वैष्णवदेवी, जगन्नाथ पुरी, उज्जैन, द्वारका, अयोध्या, रामेश्वरम, तिरुपती, पुष्कर, गया, सुवर्ण मंदिर, सम्मेद शिखर, श्रवणबेळगोळ, अजमेर शरीफ, वेलांगणी, गोवा, सोमनाथ, काशी, केदारनाथ, बद्रीनाथ, मथुरा, पंढरपूर, शिर्डी, अष्टविनायक, नांदेड गुरुद्वारा, देवीची साडेतीन पीठे, शनी शिंगणापूर, जेजुरी आदींसह जवळपास ३५ ते ४० तीर्थक्षेत्रांसाठी ही योजना असेल.