धुळे : राज्यातील इतर बाजार समित्यांप्रमाणेच येथील बाजार समितीतही कांद्याला रास्त दर मिळावा, या मागणीसाठी शेतक-यांनी केलेले आंदोलन यशस्वी ठरले. आंदोलनानंतर लाल कांद्यास क्विंटलमागे १,२५० तर पांढऱ्या कांद्याला १,१०० रुपये दर मिळाला. दुपारनंतर लिलावाची प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याचे बाजार समितीच्या प्रशासनाने सांगितले. सकाळी लिलाव सुरू होताच कांद्याला ७०० ते ८०० रुपये भाव दिला जात होता. तर झोडगे बाजार समितीत मात्र १,२०० ते १,३०० रुपये भाव दिला जात असल्याचे शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणले. मात्र त्याची दखल न घेतल्याने शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत पारोळा रोडवर रास्ता रोकोचा प्रयत्न केला. (प्रतिनिधी)
आंदोलनानंतर कांद्याला अपेक्षित भाव
By admin | Updated: January 13, 2015 02:57 IST