शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा वरदहस्त दूर अन् वैभव खेडेकरांचे ग्रहच फिरले? भाजप प्रवेश रखडला, आता दुसरीकडे...
2
मित्रासोबत बाहेर फिरायला मेडिकलची विद्यार्थीनी गेली, लैंगिक अत्याचाराचा आरोप; रुग्णालयात उपचार सुरू
3
तिसऱ्या भिडूमुळे आघाडीत धुसफुस? काँग्रेसचा ‘त्या’ मतांवर डोळा, तर उद्धवसेनेची मोठी पंचाईत!
4
तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकीच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना No Entry; विरोधक आक्रमक, प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
5
मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलेल्या विधानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; थेट फटकारले, म्हणाले,..
6
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाही; परराष्ट्र मंत्रालयाची पहिली प्रतिक्रिया
7
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
8
चेन्नई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; इंडिगो विमानाच्या कॉकपीटच्या काचेला तडा, सर्व ७६ प्रवासी सुखरूप
9
नोबेल पुरस्कार हुकला, ट्रम्प यांनी चीनवर राग काढला? चिनी वस्तूंवर १०० टक्के अतिरिक्त टॅरिफ
10
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
11
IND vs WI : अंपायरनं विकेट किपरची चूक झाकली? RUN OUT झाल्यामुळं यशस्वी जैस्वालचं द्विशतक हुकलं (VIDEO)
12
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
13
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
14
"माझा शारीरिक छळही झाला", घटस्फोटाबद्दल मयुरी वाघचा धक्कादायक खुलासा, म्हणाली- "ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच..."
15
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
16
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
17
"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
18
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
19
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
20
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  

मराठवाड्याला ‘पॅकेज’ची अपेक्षा

By admin | Updated: September 1, 2015 01:59 IST

तीन-चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करीत असलेल्या मराठवाड्यावर यंदाही निसर्ग कोपलेला आहे. आॅगस्ट महिनाही कोरडाच गेल्याने पाण्याचे अभूतपूर्व संकट उभे ठाकण्याची भीती आहे

विकास राऊत, औरंगाबादतीन-चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करीत असलेल्या मराठवाड्यावर यंदाही निसर्ग कोपलेला आहे. आॅगस्ट महिनाही कोरडाच गेल्याने पाण्याचे अभूतपूर्व संकट उभे ठाकण्याची भीती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १ सप्टेंबरपासून बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांतील पीक-पाण्याचा आढावा घेणार आहेत. दुष्काळी भागाच्या पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्री काय घोषणा करणार, याकडे लक्ष लागले आहे. पाऊसच नसल्याने विभागात खरीप हंगाम वाया गेला. लातूर, उस्मानाबाद, बीड आणि परभणी जिल्ह्यांना सर्वाधिक फटकाबसला. उसनवारी करून पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या हाती आता जळालेले पीक पाहण्यावाचून काहीच उरलेले नाही. त्यातचकर्जाच्या वाढत्या ओझ्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.मराठवाड्यातील एकूण ४३ लाख ९४० हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी ३२ लाख ५३८ हेक्टरवर (७५ टक्के) खरीप पेरणी झाली. मात्र पावसाअभावी पेरणी वाया गेली. विभागात आजवर केवळ ३२ टक्के पाऊस झाला.भर पावसाळ्यातच मराठवाड्याचा ‘टँकरवाडा’ झाला आहे. एक हजार गावे टंचाईग्रस्त झाली असून, १ हजार ३०० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.विभागातील ७ जिल्ह्यांमधील चारा छावण्यांसाठी आगामी तीन महिन्यांसाठी ३०० कोटींचा निधी लागेल. पशुधन वाचविण्यासाठी बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात प्राधान्याने छावण्या सुरू करण्याबाबत निर्णय अजून झालेला नाही. त्यामुळे जनावरे कशी जगवायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. हिंगोली वगळता उर्वरित ७ जिल्ह्यांतील पशुधनासाठी रोज तीन ते सव्वातीन कोटींच्या आसपास खर्च अपेक्षित असल्याचा अहवाल प्रशासनाने केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठवाड्यातील स्थितीचा आॅगस्टमध्ये आढावा घेतला. केंद्रीय दुष्काळ निवारण विभागाचे अतिरिक्त आयुक्त राघवेंद्रसिंग यांनी आॅगस्टच्या मध्यास विभागाचा धावता दौरा केला. त्यानंतर २३ व २४ आॅगस्टला मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्तालयात बैठक घेतली. त्यात मराठवाड्याचा अनुशेषही गाजला.