शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

वादविवादाचे वृत्त निराधार, गैरसमज माध्यमांद्वारे होऊ नयेत एवढीच अपेक्षा- डॉ. नीलम गो-हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 05:33 IST

आम्ही पक्षात सहकारी म्हणून काम करीत आहोत व आमच्यात कोणतेही वाद नाहीत़ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार काम करताना त्याबाबत गैरसमज माध्यमांद्वारे होऊ नयेत एवढीच अपेक्षा आहे, असे निवेदन खासदार श्रीरंग बारणे व आमदार डॉ़ नीलम गो-हे यांनी काढले आहेत. 

पुणे : आम्ही पक्षात सहकारी म्हणून काम करीत आहोत व आमच्यात कोणतेही वाद नाहीत़ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार काम करताना त्याबाबत गैरसमज माध्यमांद्वारे होऊ नयेत एवढीच अपेक्षा आहे, असे निवेदन खासदार श्रीरंग बारणे व आमदार डॉ़ नीलम गो-हे यांनी काढले आहेत. शिवसेनेच्या बैठकीत बारणे व डॉ. गो-हे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या शिवसेनेच्या आमदार आणि मंत्र्यांच्या बैठकीत चांगलाच राडा झाला होतो. मंत्री आणि आमदारांमध्ये जुंपल्याने प्रकरण शिवीगाळ व हातघाईवर गेले. खा. श्रीरंग बारणे यांच्याशी झालेल्या शाब्दिक बाचाबाचीमुळे उपनेत्या आ. नीलम गो-हे यांना रडू कोसळल्याचंही वृत्तही समोर आलं होतं. त्यावर अखेर नीलम गो-हेंनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. ‘मातोश्री’वर झालेल्या या बैठकीची माहिती बाहेर जाऊ नये, म्हणून सर्वांचे मोबाइल बंद ठेवण्यात आले होते. प्रारंभीच आमदारांनी स्वपक्षाच्या मंत्र्यांविरुद्ध नाराजीचा सूर लावला. आ. भरत गोगावले यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी मंत्र्यांनी पैसे उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी केली. मंत्री आमची कामे करत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला होता.त्यावर मंत्री रामदास कदम चांगलेच भडकले. ‘आम्हाला मंत्री बनण्याची खाज नाही, जे मंत्री तुमची कामे करत नाहीत त्यांची नावे घेऊन बोला. सगळ्यांना एकाच पारड्यात का मोजता?’ असे रामदास कदम यांनी खडसावले. त्यावर ‘मला उद्धव ठाकरेंनी विचारले, तर नाव सांगेन. तुम्हाला का सांगू,’ असा प्रतिप्रश्न आ. गोगावले यांनी केल्याने दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे समजते.>नीलम गो-हेंना अश्रू अनावरउद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भेट झाली नव्हती म्हणून आ. नीलम गो-हे पुण्याहून चितळेंचे पेढे घेऊन बैठकीला आल्या होत्या. पेढे-पुष्पगुच्छ देऊन ठाकरेंचे अभीष्टचिंतन केले. बैठकीत खा. श्रीरंग बारणे यांनी गो-हे यांच्याविरोधात ‘कॉमेन्ट’ केल्याने दोघांत शाब्दिक चकमक उडाली होती. स्वत: उद्धव यांनी मध्यस्थी करत दोघांना शांत केले होते. बैठक संपल्यानंतर त्यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली, त्या वेळी ‘हे असले वागणे आम्ही कसे सहन करायचे?’ असे म्हणत नीलम गो-हे यांना अश्रू आवरणे कठीण झाले होते.