शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

प्रभूकृपेमुळे रेल्वेमार्गांचा विस्तार

By admin | Updated: April 5, 2017 06:18 IST

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी भारतीय रेल्वेचे जाळे देशभर पसरवण्याचा निर्णय घेतला.

मुंबई : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी भारतीय रेल्वेचे जाळे देशभर पसरवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची कठोर अंमलबजावणी करत २0१६-१७ मध्ये देशभरात २ हजार ८५५ किलोमीटरच्या नवीन लाईन, दुहेरीकरण आणि मार्गांचे परिवर्तन करुन ते प्रत्यक्षात कार्यान्वित केले. हे काम करतानाच ९३५ किलोमीटर नवीन मार्गांचा शुभारंभ करण्यात आल्याची माहिती मध्य व पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.रेल्वेकडून नवीन लाईन, दुहेरीकरण, विद्युतीकरण यावर भर दिला जात असतानाच अपघातांना आळा बसावा यासाठी मानवरहित व मानवयुक्त रेल्वे फाटक बंद केले जात आहेत. सब-वे, पुल, पुलांची दुरुस्ती करण्यात येत आहे. २0१६-१७ मध्ये भारतीय रेल्वे मार्गावर २,८५५ किलोमीटरच्या नवीन लाईन, दुहेरीकरण व रुळांमध्ये परिवर्तन करण्यात आले. हे काम करतानाच उत्तर-पूर्व क्षेत्रात संपूर्ण रुळ ब्रॉड (रुळांमधील अंतर वाढवणे)गेज करण्यात आले. देशभरातील रेल्वे मार्गांच्या विद्युतीकरणाचे रेल्वेचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी दोन हजार किमीचे उद्दिष्ट वर्षभरात ठेवलेले असतानाच त्यापेक्षा जास्त म्हणजेच २,0१३ किमीचे विद्युतीकरण पूर्ण केले आहे. त्यामुळे विजेची मोठी बचत होतानाच रेल्वेचा वेग वाढण्यासही मदत मिळेल. देशभरात मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे अपघात होतात. यातील बहुसंख्य मानव रहित फाटक आणि मानवयुक्त फाटकांजवळ होतात. त्यामुळे हे फाटक बंद करण्यात आले आहेत. २0१६-१७ मध्ये १ हजार ५0३ मानव रहित फाटक आणि ४८४ मानवयुक्त फाटक बंद केले आहेत. त्यामुळे अपघातांना आळा बसेल, अशी रेल्वेला आशा आहे. (प्रतिनिधी)>२0१६-१७ मधील कामे1306 रोड ओव्हरब्रीज, सब-वे कार्यान्वित 750 पुलांची दुरुस्ती 45 मालवाहतूक टर्मिनल 4280 प्रवासी डब्यांची निर्मिती.