शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण, उल्हासनगर्पयत नवी मुंबई मेट्रोचा विस्तार

By admin | Updated: July 9, 2014 00:32 IST

भागीदारी तत्त्वावर मेट्रो मार्ग विस्ताराची योजना असून त्यासंबंधीचा कार्यअहवाल तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी दिली.

नवी मुंबई : नवी मुंबई मेट्रोचा विस्तार कल्याण व उल्हासनगर्पयत करण्याची सिडकोची योजना आहे. एमएमआरडीए आणि राज्य शासनाच्या सहभागातून भागीदारी तत्त्वावर मेट्रो मार्ग विस्ताराची योजना असून त्यासंबंधीचा कार्यअहवाल तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी दिली.
सिडकोच्या माध्यमातून बेलापूर ते तळोजा (पेंधर) या अकरा कि.मी. लांबीच्या मेट्रो मार्गाचे काम तीन वर्षापासून सुरू आहे. या प्रकल्पासाठी तब्बल साडेचार हजार कोटी खर्च होणार आहे. प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. असे असले तरी विमानतळाच्या पाश्र्वभूमीवर शहरातील दळणवळण यंत्रणा अत्यंत सक्षम करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई मेट्रोचा विस्तार कल्याण आणि उल्हासनगर्पयत करण्याची सिडकोची योजना आहे. त्यासाठी एमएमआरडीए आणि राज्य शासनाची मदत घेणार आहे. त्यादृष्टीने प्राथमिक कार्यवाही सुरू करण्यात आल्याचे हिंदूराव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)