शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या ‘नवप्रकाश’ योजनेला जुलैपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2017 02:15 IST

वीजग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी सुरू असलेल्या ‘नवप्रकाश’ योजनेला येत्या ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

मुंबई : थकीत वीजदेयकांमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या सार्वजनिक ग्राहक वगळून इतर सर्व उच्च व लघुदाब वीजग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी सुरू असलेल्या ‘नवप्रकाश’ योजनेला येत्या ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.या योजनेंतर्गत ३० एप्रिलपर्यंत मूळ थकबाकीचा भरणा केल्यास व्याज व विलंब आकार रक्कम माफ होणार आहे. १ मे ते ३१ जुलै २०१७ या कालावधीत मूळ थकबाकीसह व्याजाची २५ टक्के रक्कम भरल्यास उर्वरित ७५ टक्के व्याज व विलंब आकार रक्कम माफ करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणने दिली. योजनेचा लाभ ३१ मार्चपर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या कृषीपंपधारक, घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक तसेच अन्य वर्गवारीतील वीजग्राहकांना घेता येईल. याचबरोबर लोकअदालत किंवा न्यायप्रविष्ट असलेल्या थकबाकीच्या प्रकरणातील थकबाकीदारांनादेखील या योजनेत सहभागी होता येणार आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणात हुकूमनामा मंजूर होऊन १२ वर्षांपेक्षा अधिक काळ झाला असल्यास अशा ग्राहकांनाही या योजनेचा लाभ घेता येईल, असे महावितरणने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)थकबाकी ‘आॅनलाइन’देखीलमूळ थकबाकीची रक्कम आॅनलाइनही स्वीकारण्यात येणार आहे. संबंधित ग्राहकांच्या थकीत देयकांची किती रक्कम जमा करावी, याची तपशीलवार माहिती ‘आॅनलाइन’ उपलब्ध आहे. या योजनेंतर्गत थकबाकीमुक्त ग्राहकांना त्वरित वीजजोडणी देण्यात येणार आहे. त्यासाठी सुरक्षा ठेव, सेवा शुल्क, रिकनेक्शन शुल्क यातही सूट देण्यात येणार आहे. महावितरणच्या संकेतस्थळावर ही सर्व माहिती उपलब्ध आहे.