मुंबई : ठाणे-भिवंडी-कल्याण (टप्पा ५) आणि स्वामी समर्थनगर-विक्रोळी (टप्पा ६) या दोन मेट्रो प्रकल्पांना आज मंजुरी देण्यात आली. या दोन्ही प्रकल्पांसाठी एकूण १५ हजार ८८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.ठाणे-भिवंडी-कल्याण हा मेट्रो रेल्वे प्रकल्प ८ हजार ४१६ कोटी रुपये खर्चाचा आहे. तर स्वामी समर्थनगर-विक्रोळी मेट्रो प्रकल्प (टप्पा ६) हा ६ हजार ६७२ कोटी रुपये खर्चाचा आहे. अशा रीतीने एकूण १५ हजार ८८ कोटी रुपयांच्या दोन प्रकल्पांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालीे एमएमआरडीएच्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली. हे दोन्ही प्रकल्प २०२१ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. या मेट्रो मार्गांवर किमान भाडे हे १० रुपये असेल. दर पाच मिनिटांनी एक सहा डब्यांची गाडी या मार्गांवर धावणार आहे. दहिसर ते मीरा-भार्इंदरपर्यंतच्या मेट्रो मार्गासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश आपण आजच्या बैठकीत दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी नंतर पत्रपरिषदेत सांगितले. यावेळी मुंबई मेट्रोच्या लोगोचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. कोपरी (ठाणे) येथे रेल्वे ओलांडणी पुलाच्या रुंदीकरणासाठी २५९ रुपये आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आले. हा पुल दुप्पट रुंद करण्यात येणार आहे. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीला गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, महापालिका आयुक्त अजोय मेहता, एमएमआरडीएचे आयुक्त यूपीएस मदान, रायगड जि.प.पचे अध्यक्ष सुरेश टोकरे, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)>कल्याण मेट्रोवर १७ स्थानकेठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो २४ किमी. लांबीचा असून या मार्गावर एकूण १७ स्थानके असतील. त्यात कल्याण एपीएमसी, कल्याण स्थानक, सहजानंद चौक, दुर्गाडी किल्ला, कोनगाव, गोवेगाव एमआयडीसी, राजनोली गाव, टेमघर, गोपाळनगर, भिवंडी, धामणकर नाका, अंजूर फाटा, पूर्णा, काल्हेर, कशेळी, बाळकुम नाका, कापूरबावडीचा समावेश आहे. >स्वामी समर्थनगर-विक्र ोळी मेट्रोवर असणार १३ स्थानकेस्वामी समर्थनगर-जोगेश्वरी-विक्र ोळी या मार्गाची लांबी १४.५ किमी. आहे. या मार्गावर १३ स्थानके असतील. त्यात स्वामी समर्थनगर, आदर्शनगर, मोमीननगर, जेव्हीएलआर, श्यामनगर, महाकाली गुंफा, सीप्झ गाव, साकी विहार मार्ग, रामबाग, पवई तलाव, आयआयटी पवई, कांजूरमार्ग (पश्चिम) विक्र ोळी पूर्व द्रुतगती मार्ग यांचा समावेश आहे.>मुंबईत ५०० वायफाय हॉटस्पॉटसाठी १९४ कोटीमुंबई शहरामध्ये ५०० वाय-फाय हॉटस्पॉट निर्माण करण्यासाठी १९४ कोटी रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. शहर हायटेक करण्यासाठीचे हे महत्त्वाकांक्षी पाऊल असेल. महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान महामंडळातर्फे माहिती आणि तंत्रज्ञान संचालनालयाच्या नियंत्रणाखाली हे काम करण्यात येईल.
मेट्रो रेल्वेचा विस्तार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2016 06:56 IST