शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात शेतमाल प्रक्रिया उद्योगांचा विस्तार!

By admin | Updated: May 11, 2015 02:27 IST

अकोला जिल्हय़ात कानशिवणी येथे शेतक-यांचा प्रकल्प.

अकोला : खेड्यातच शेतमालावर प्रक्रिया करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने पावले उचलली जात असून, विदर्भात कृषिमालावर आधारित प्रक्रिया केंद्र उभारण्यात येत आहेत. आता अकोला जिल्हय़ातील येवता, विझोरा नंतर कानशिवणी येथे प्रक्रिया उद्योगाला सुरुवात होत आहे. या अगोदर कंझरा येथे महिला बचत गटासाठी कृषिमाल प्रक्रिया केंद्राची स्थापना केल्यांनतर आता याच जिल्हय़ातील कानशिवणी येथे शिवानंद वाघमारे या शेतकर्‍याचा शेतमाल प्रक्रिया उद्योग उभा राहत आहे. या ठिकाणी या शेतकर्‍याचे डाळ गिरणी, सफाई व पॉलिशर लावण्यात येत आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयांतर्गत कार्यरत भारतीय कृषी संशोधन परिषदेने, असे प्रकल्प खेड्यात निर्माण करण्याची जबाबदारी अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प, कापणीपश्‍चात तंत्रज्ञान या विभागाकडे सोपविली आहे. विदर्भात डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून शेतात तयार होणारे कडधान्य, तृण धान्य इत्यादी पीक उत्पादनाचा आढावा घेण्यात आला असून, त्यानंतर या ठिकाणी पीकेव्ही दाल मिल, मसाला व शेवई आदी विविध यंत्र टाकण्यात येत आहेत. खेड्यातील शेतमालावर खेड्यातच प्रक्रिया करण्याचा हा प्रयत्न आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद दिल्लीच्या माध्यमातून विदर्भातील शेतकर्‍यांनी उद्योग उभारावे, यादृष्टीने डॉ. पंजाबराव देशमुख कृ षी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यांना शेतकर्‍यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत सहा गावांत कृषी माल प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या प्रक्रिया केंद्राला गावकरी, शेतकर्‍यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने शेतकरी, बचत गटासह अनेकांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध होत आहे.