शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

संघाच्या धर्तीवर भाजपातही विस्तारक

By admin | Updated: December 29, 2016 01:41 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्तीवर आता भारतीय जनता पार्टीमध्येही विस्तारक नेमण्यात येणार आहेत. त्यानुसार १५ दिवसांपासून सहा महिने ते एक वर्षासाठी विस्तारक

- यदु जोशी, मुंबईराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्तीवर आता भारतीय जनता पार्टीमध्येही विस्तारक नेमण्यात येणार आहेत. त्यानुसार १५ दिवसांपासून सहा महिने ते एक वर्षासाठी विस्तारक म्हणून पक्षकार्य करता येईल. जनसंघाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष पं.दीनदयाल उपाध्याय यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून त्या निमित्त भाजपाने राष्ट्रीय पातळीवर शताब्दी विस्तारक योजना हाती घेतली आहे. त्या अंतर्गत महाराष्ट्रात प्रत्येक बुथवर एक या प्रमाणे सुमारे ९० हजार विस्तारक १५ दिवसांसाठी पाठविण्याची योजना आखण्यात आली आहे. पक्षाचा एक कार्यकर्ता दुसऱ्या गावातील बुथवर १५ दिवसांसाठी विस्तारक म्हणून जाईल. तेथील पक्षसदस्यांच्या भेटी घेईल, प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकी आणि अन्य कार्यक्रमांचे आयोजन करेल. या विस्तारकांना ‘अल्पावधी शताब्दी विस्तारक’ असे संबोधण्यात येणार आहे. राज्यात सुमारे ५०० भाजपा कार्यकर्त्यांना विस्तारक म्हणून पाठविण्यात येणार आहे. त्यांच्या कामाचे नेमके स्वरुप काय असेल या संदर्भात चार दिवसांचे प्रशिक्षण शिबीर येत्या मार्चमध्ये होणार आहे. या योजनेसंदर्भात तीनशे प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक बैठक आज मुंबई भाजपाच्या कार्यालयात झाली. अ.भा.सहसंघटन मंत्री व्ही.सतीश आणि संतोष यांनी मार्गदर्शन केले. येत्या एप्रिलपासून ही विस्तारक योजना सुरू होणार असून ती २०१८ च्या जुलैपर्यंत चालेल. विस्तारक योजना यशस्वी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पाच जणांची एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्यात भाजपाचे जिल्हाध्यक्ष आणि संघ परिवारातील एका संघटनेचे पदाधिकारी यांचाही समावेश असेल.भाजपा आज केंद्र आणि राज्यातही सत्तेत असला तरी पक्षाचे यश दीर्घकाळ टिकवून ठेवायचे असेल तर संघटन मजबूत असलेच पाहिजे. विस्तारकांची मजबूत फळी निर्माण करण्याचा हाच उद्देश आहे. हे विस्तारक राज्यातील एक कोटी सहा लाख पक्षसदस्यांना पक्षकार्यासाठी सक्रिय करतील. - रामदास आंबटकर, राज्य संयोजक, विस्तार योजना