शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

महाआघाडीचा महागोंधळ

By admin | Updated: February 4, 2017 02:45 IST

भारतीय जनता पार्टीने आज रिपाइं, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्रामला सोबत घेत मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीची मोट बांधली. मात्र, २५ जागा मिळालेल्या

मुंबई : भारतीय जनता पार्टीने आज रिपाइं, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्रामला सोबत घेत मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीची मोट बांधली. मात्र, २५ जागा मिळालेल्या रिपाइंने तब्बल ९० वॉर्डांमध्ये अर्ज भरल्याने उद्या माघारीची कसरत भाजपाला करावी लागणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे, शिक्षण मंत्री विनोद तावडे, रासपचे नेते आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, शिवसंग्रामचे विक्रांत आंबरे आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ.आशिष शेलार यांच्या उपस्थितीत महायुतीची घोषणा करण्यात आली. ‘ज्यांच्यासोबत रिपाइं जातो त्यांची सत्ता येते, असे सांगून आठवले म्हणाले की, आम्ही भाजपाकडे अधिक जागा मागितल्या होत्या. ४० ते ४५ जागा मिळण्याची अपेक्षा होती. पण फार जागा मागून भाजपाची अडचण करू नये, अशी भूमिका आम्ही घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतरांसाठी चर्चेतून हा निर्णय घेतला. महादेव जानकर म्हणाले की, भाजपाने आमच्या पक्षाला ६ जागा दिल्या, ती खूश आहे. मुख्यमंत्र्यांनी ओबीसी मंत्रालय स्थापण्याची घोषणा करून ओबीसींना न्याय दिला आहे. भाजपा मित्र पक्षांचा मानसन्मान राखत आहे. आमच्या पक्षाला महायुतीमध्ये ४ जागा मिळाल्या. आम्ही समाधानी आहोत पण संतुष्ट नाही. निदान रासपाइतक्या म्हणजे ६ जागा तरी मिळायला हव्या होत्या, असे शिवसंग्रामचे विक्रांत आंबरे म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)रिपाइंला उपमहापौरपद- भाजपाच्या नेतृत्वातील महाआघाडीचीच सत्ता येईल आणि त्यावेळी उपमहापौरपद व महत्त्वाच्या एका समितीचे अध्यक्षपद हे रिपाइंला देण्यात येईल. तसेच, इतर मित्रपक्षांनादेखील सन्मानाचे स्थान दिले जाईल, असे खा.रावसाहेब दानवे आणि विनोद तावडे यांनी जाहीर केले.शिवसंग्राम कमळावरशिवसंग्रामचे चार उमेदवार हे कमळ चिन्हावर लढणार असल्याची माहिती भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली. रिपाइंचे काही उमेदवारदेखील भाजपाच्या चिन्हावर लढणार आहेत. वॉर्डातील राजकीय परिस्थिती बघून तसे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. महायुतीमध्ये भाजपा १९२ रिपाइं २५, रासप ६ तर शिवसंग्राम ४ जागा लढणार आहे असे जाहीर करण्यात आले मात्र, रिपाइंला आणखी चार जागा देण्याचा विचार केला जाईल, असे भाजपाच्या नेत्यांनी सांगितले. रिपाइंला दिलेल्या २५ जागांपैकी पाच ते सात जागांवर भाजपानेही उमेदवार दिले आहेत. भाजपाकडे असलेल्या अनेक जागांवर रिपाइंच्या उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत. ठरवून दिलेल्या जागांवरच दोघांचे उमेदवार लढतील आणि इतर माघार घेतील, असा विश्वास भाजपाच्या नेत्यांनी व्यक्त केला.