शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

‘फार्ससम्राट’ची एक्झिट

By admin | Updated: February 8, 2015 01:48 IST

ज्येष्ठ अभिनेते ‘फार्ससम्राट’ आत्माराम भेंडे यांचे शनिवारी सकाळी वृद्धापकाळाने येथील रत्ना रुग्णालयामध्ये निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते.

पुणे : फार्सिकल विनोदी नाटकाला नवे आयाम देत सहा दशकांहून अधिक काळ मराठी रंगभूमीवर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते ‘फार्ससम्राट’ आत्माराम भेंडे यांचे शनिवारी सकाळी वृद्धापकाळाने येथील रत्ना रुग्णालयामध्ये निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते.मुलगा नंदू भेंडे यांच्या मृत्यूनंतर ते वृद्धाश्रमात राहत होते. त्यांची मुलगी अमेरिकेत वास्तव्याला आहे. त्या अमेरिकेहून परतल्यानंतर रविवारी भेंडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.नाशिकला १९८१मध्ये झालेल्या ६१व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदही भेंडेंनी भूषवले होते. दुर्दैवाने बेळगाव येथे अखिल भारतीय मराठी नाट्य संमलेनास शनिवारपासून प्रारंभ झाला आणि त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाल्याने कलाकारांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. भेंडे यांचा जन्म ७ मे १९२३ रोजी झाला. इंडियन नॅशनल थिएटरमधून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली होती. ‘मन पाखरूपाखरू’, ‘प्रीती परी तुजवरती’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘पळा पळा कोण पुढे पळे’ या नाटकांतून त्यांनी आपले अभिनय कौशल्य दाखविले. अलीकडच्या काळात त्यांच्या चरित्र भूमिका रसिकांना भावल्या. तरुणाईला तर ते आपल्या घरातले आजोबाच वाटले. ‘लगे रहो मुन्नाभाई’मध्ये त्यांनी साकारलेला ‘आत्माराम’ सगळ्यांनाच भावला होता. त्याचबरोबर ‘यंदा कर्तव्य आहे’ या चित्रपटातील छोटेखानी भूमिका ही प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालत राहिली.१९६०-७०च्या दशकात लेखक बबन प्रभू आणि दिग्दर्शक आत्माराम भेंडे या जोडीनं मराठी रंगभूमीला फार्सिकल नाटकांची ओळख करून दिली आणि रसिकांना अगदी खळखळून हसवलं. एक सुसंस्कृत विनोदी अभिनेते म्हणून भेंडे यांनी स्वत:चा ठसा उमटवला होता. ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’, ‘झोपी गेलेला जागा झाला’, ‘पिलूचं लग्न’ ही त्यांची नाटकं तुफान गाजली होती. मराठी रंगभूमीप्रमाणेच हिंदी, इंग्रजी रंगभूमीवरही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. दूरदर्शनवरील मालिकाही त्यांनी दिग्दर्शित केल्या होत्या. भेंडे यांना नाट्यदर्पण, शंकरराव घाणेकर, नाट्यभूषण, चिंतामणराव कोल्हटकर, नटसम्राट नानासाहेब फाटक, प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव या मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. त्यांना २००६-०७मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने सांस्कृतिक पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. (प्रतिनिधी)अष्टपैलू अभिनेता हरपलाज्येष्ठ अभिनेते आत्माराम भेंडे यांच्या निधनाने आपल्या सहजसुंदर अभिनयाने मराठी रंगभूमी गजावणारा एक अष्टपैलू रंगकर्मी हरपला आहे. भेंडे यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने रसिकांना तब्बल सहा दशके निखळ आनंद दिला. इंडियन नॅशनल थिएटरमधून अभिनयाला सुरुवात केल्यानंतर त्यांनी ‘एक सुसंस्कृत विनोदी अभिनेता’ म्हणून ठसा उमटविला. याशिवाय सर्वच प्रकारच्या भूमिका त्यांनी ताकदीने साकारल्या. दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही त्यांचे योगदान मोठे आहे. चित्रपट आणि दूरचित्रवाणीवरील मालिकांसोबतच मराठी, हिंदी आणि इंग्रजी नाटकांमधून अमिट छाप उमटविणाऱ्या एका अभिजात कलावंताला आपण मुकलो याची खंत आहे.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्रीचित्रपटसृष्टीतील ‘आत्मा’ गमविला गेल्या सहा दशकांहून अधिक काळ मराठी रंगभूमीवर अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता म्हणून कार्यरत असणारे ज्येष्ठ अभिनेते आत्माराम भेंडे यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीतला आत्मा गमावला आहे. चित्रपट, मालिका आणि नाटक या तिन्ही माध्यमांत आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या आत्माराम भेंडे यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने हिंदी, इंग्रजी रंगभूमीवरही ठसा उमटविला होता. आज ९५व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन होत आहे; आणि आजच माजी नाट्य संमेलनाध्यक्ष असलेल्या भेंडे यांचे निधन झाल्याने मराठी कलाविश्वातून हळहळ व्यक्त होत आहे. - विनोद तावडे, सांस्कृतिक कार्य मंत्रीसुसंस्कृत विनोदी अभिनेत्याचे निधनमराठी व हिंदी रंगभूमी, चित्रपट, जाहिराती आणि मालिकांच्या माध्यमातून गेली ६० वर्षे रसिकांना आनंद देणारे ज्येष्ठ कलाकार आत्माराम भेंडे यांचे निधन झाले आहे. एक सुसंस्कृत विनोदी अभिनेते म्हणून त्यांनी स्वत:चा विशेष ठसा उमटवला होता. अभिनयासोबतच त्यांनी दिग्दर्शक आणि निर्मात्याची जबाबदारी अगदी समर्थपणे पेलली होती. भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.- रावसाहेब पाटील-दानवे, भाजपा प्रदेशाध्यक्ष