शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

बहिष्कृत विवाहितेने केली आत्महत्या

By admin | Updated: April 25, 2016 05:16 IST

दुसरा विवाह केल्यामुळे समाजातील लोकांनी टाकलेला बहिष्कार सहन न झाल्याने एका ३५ वर्षीय महिलेने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.

नांदगावपेठ /अमरावती : दुसरा विवाह केल्यामुळे समाजातील लोकांनी टाकलेला बहिष्कार सहन न झाल्याने एका ३५ वर्षीय महिलेने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ही दुर्देवी घटना शनिवारी रात्री पिंपळविहीर येथे घडली. मृत्यूनंतरही बहिष्कार कायम असल्याने अखेर पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन मृत महिलेवर अत्यसंस्कार केले.मोगरा येथील सरमेशा हिचा काही वर्षांपूर्वी अरुण पवारशी विवाह झाला. मात्र, दोन महिन्यांपूर्वी तिने विकास पवार याच्यासमवेत संसार थाटला. त्यामुळे पारधी समाजाने तिच्यावर बहिष्कार टाकला. घराबाहेर दिसताच समाजातील उदे्रकाला तिला सामोरे जावे लागत होते. अखेर तिने कंटाळून शनिवारी रात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.येथील शिक्षक चंद्रकांत पवार व त्यांच्या सहकार्यांनी याबाबत नांदगावपेठ पोलिसांना माहिती देऊन तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी सरमेशाला मृत घोषित केले. रविवारी सकाळी शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह पिंपळविहीर येथे आणल्यानंतर समाजातील नागरिकांचा बहिष्कार कायम राहिल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी कुणी पुढे आले नाही. याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य विनोद डांगे व सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस बंदोबस्तात तिच्यावर अंत्यसंस्कार केले. यावेळी सरमेशाचे वडील पंचम भोसले व तिचा भाऊ बलदेव यांच्या व्यतिरिक्त समाजातील एकही व्यक्ती पुढे आला नाही.