शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
4
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
5
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
6
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
7
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
8
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
9
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
10
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
11
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण
12
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
13
वाद-प्रतिवाद सुरू असलेल्या भारताला आज स्वीकारमंत्र अंगीकारण्याची गरज -मोरारीबापू
14
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
15
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
16
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
17
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
18
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
19
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
20
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल

कालबाह्य खताची नव्या थैल्यांमध्ये विक्री

By admin | Updated: June 19, 2014 22:08 IST

जिल्हा पणन महासंघाच्या गोदामातून गोरखधंदा

खामगाव : कालबाह्य झालेले खत नवीन थैल्यांमध्ये भरुन त्याची विक्री केल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार आज येथे उघडकीस आला. कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी पंचनामा करुन सदर खतसाठा 'सिल' केला आहे.

खामगाव येथील औद्योगिक वसाहतीमध्ये जिल्हा पणन महासंघाची गोदामे आहेत. त्यापैकी शेवटच्या गोदामात कालबाह्य झालेला जुना खतसाठा 'थ्रेशर'च्या साहाय्याने बारीक करुन, नवीन उत्पादन दिनांक टाकलेल्या नवीन थैल्यांमध्ये भरण्याचे काम सुरू होते. अशा थैल्यांची कृषी केंद्रांमार्फत शेतकर्‍यांना विक्री करण्यात येत होता. ही माहिती आ .भाऊसाहेब फुंडकर यांना मिळाल्यानंतर, त्यांनी कार्यकर्त्यांसह सदर गोरखधंदा सुरू असलेल्या ठिकाणी भेट दिली. यावेळी शेवटच्या गोदामात एप्रिल २0११ अशी उत्पादन दिनांकाची नोंद असलेल्या 'इफको' खताच्या थैल्या फोडून त्यामधील ढेकूळ झालेले खत 'थ्रेशर'मधून बारीक करणे आणि ओडिसा राज्यातील जगतसिंगपूर जिल्ह्यातील पारादीप येथील पत्ता असलेल्या इंडियन फार्र्मस फर्टिलायझर कंपनी लिमिटेड या कंपनीच्या नावाच्या थैल्यांमध्ये भरणे सुरू होते. सदर थैल्यांवर मे २0१३ अशी उत्पादन दिनांक मुद्रित केलेली होती. वजन न करताच 'सिल' करण्यात येत असलेल्या या थैल्या विक्रीसाठी नेण्यात येत असल्याचे यावेळी दिसून आले. आ. फुंडकर यांनी तालुका कृषी अधिकारी जी. सी. कोठारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश वाघ, पंचायत समितीचे कृषी अधिकारी अशोक पल्हाडे, तसेच शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर यांना पाचारण केल्यानंतर, सदर खतसाठय़ाचा पंचनामा करून तो 'सिल' करण्यात आला.

** सदर कारवाई सुरु असतानाच एम.एच.२८ एच ९७९४ क्रमांकाची टाटा ४0७ घेवून डोंगरखंडाळा ता.बुलडाणा येथील कृषी केंद्र संचालक मधूकर भीमराव सावळे हे खत घेण्यासाठी आले होते. १0 टन खत घेण्याबाबत जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्यासोबत बोलणे झाले असून या खतासाठीची रक्कम सुध्दा दिली असल्याचे यावेळी मधूकर सावळे यांनी सांगितले.

** सहा गोदाम सील **  

मुदतबाह्य रासायनिक खत नव्या थैल्यांमध्ये भरुन विक्री करण्याचा प्रकार आज येथे मार्केटिंग फेडरेशनच्या गोदामावर उघडकीस आला. त्यामुळे पोलिसांनी येथील स्थानिक औद्योगिक वसाहत परिसरातील खतसाठा सील केला आहे. तर रात्री उशीरापर्यंत आणखी ६ गोदाम सील केले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक औद्योगिक वसाहतमध्ये असलेल्या मार्केटिंग फेडरेशनच्या गोदामात जुने कालबाह्य खत नवीन थैल्यांमध्ये भरल्या जात होते. त्यामुळे आ.भाऊसाहेब फुंडकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जावून अधिकार्‍यांना पंचनामा करायला लावला. यावेळी सदर प्रकार उघडकीस येत असल्याचे पाहून गोदामपालक गोहोकार याने उपस्थितांच्या ताब्यातून दुरुस्तीच्या नावावर पॅकींग मशीन पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिस दाखल झाल्यानंतर सदर मशीन परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले. यामुळे येथे खताचा गोरखधंदा सुरु असल्याचा संशय आणखीनच बळावला. फसवणूक टाळण्यासाठी खत घेवू नये सन २0१३ उत्पादन तिथी दाखविण्यात येवून जुने खत भरण्यात येत आहे. त्यामुळे अशा बनावट पिशव्या भरलेल्या इफको कंपनीच्या २0.२0.0.१६ या रासायनिक खतातून शेतकर्‍यांची फसवणूक होवू शकते. त्यामुळे खत नवीन असल्याची खात्री करुनच शेतकर्‍यांनी खत विकत घ्यावे व फसवणूक टाळावी, असे आवाहन यावेळी आ.भाऊसाहेब फुंडकर यांनी केले. राज्यात हजारो शेतकरी आत्महत्या करीत असताना शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍या या प्रकारामुळे एरवी शांत असलेले आ.भाऊसाहेब फुंडकर चांगलेच आक्रमक झाले. राज्यात १३ हजाराच्यावर शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. आणखी किती जीव घेणार, असा प्रश्न उपस्थित करून भ्रमणध्वनीवरुन त्यांनी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. यामुळे गोदामपालक गोहोकार याचीही पाचावर धारण बसून त्याने साहेबांच्या आदेशानुसार सदर प्रकार चालत असल्याचे यावेळी सांगितले. शेतकरी मोठय़ा आशेने खत टाकतात मात्र सदर प्रकार उघडकीस आल्याने शेतकर्‍यांकडून रोष व्यक्त केल्या जात आहे.