शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पोटच्या मुलीचा खून करणाऱ्याला फाशी

By admin | Updated: April 17, 2016 02:37 IST

चारित्र्याच्या संशयावरून स्वत:च्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा खून करणाऱ्या इस्लामउद्दीन सद्दीत अन्सारी (वय ६५, रा. प्रसादनगर, राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी) याला प्रधान जिल्हा न्यायाधीश

अहमदनगर : चारित्र्याच्या संशयावरून स्वत:च्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा खून करणाऱ्या इस्लामउद्दीन सद्दीत अन्सारी (वय ६५, रा. प्रसादनगर, राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी) याला प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीकांत द. कुलकर्णी यांनी शनिवारी फाशीची शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा न्यायालयातील गेल्या पाच वर्षांतील तिसरी तर दोन महिन्यांतील ही दुसरी फाशीची शिक्षा ठरली आहे.घटनेच्या दिवशी म्हणजे १ मे २०१५ रोजीच्या मध्यरात्री मयत अल्पवयीन मुलगी गुलअब्सा, तिची दुसरी बहीण नर्गिस, मुलगा, सून, आई आणि वडील असे चौघे घरात झोपले होते. त्यापैकी मयत मुलगी घरातील एका स्वतंत्र खोलीत झोपली होती. घटनेच्या रात्री मयत मुलगी एक वाजता घरातून निघून गेली आणि रात्री २.३० वाजता घरात परत आली. सकाळी सहाच्या सुमारास आरोपीने मुलीला लाकडी दांडक्याने मारहाण केली. या वेळी आलेल्या आवाजाने मुलीची आई धावत-पळत खोलीत गेली. मुलीच्या आईने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने काहीही न ऐकता तिला मारहाण करीत व गळा आवळून तिचा खून केला. यावेळी आरोपीसह सर्वच घरात होते. त्यानंतर आरोपी पळून गेला. अज्ञाताने राहुरी पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिल्यानंतर आईच्या जबाबावरून पोलिसांनी तिच्या बापाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल सुनील अंबादास आहेर यांनी फिर्याद दाखल केली. श्रीमती आर. एस. चव्हाण यांनी तपास करून २१ जून २०१५ रोजी जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याच्या नियमित सुनावणीला ६ जानेवारी २०१६ पासून प्रारंभ झाला. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. अनिल डी. सरोदे यांनी सात साक्षीदार तपासले. पुरावा व भक्कम युक्तिवादाच्या आधारे आरोपीस फाशीची शिक्षा ठोठावली. (प्रतिनिधी)श्रीमती आर. एस. चव्हाण यांनी तपास करून २१ जून २०१५ रोजी जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याच्या नियमित सुनावणीला ६ जानेवारी २०१६ पासून प्रारंभ झाला. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. अनिल डी. सरोदे यांनी सात साक्षीदार तपासले.