शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
11
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
12
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
13
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
14
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
15
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
16
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
17
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
18
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
19
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
20
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...

आयटी उद्योगांसाठी पायघड्या

By admin | Updated: August 29, 2015 23:40 IST

राज्यात येत्या वर्षात माहिती तंत्रज्ञान उद्योगात ५० हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करून सुमारे १० लाख रोजगार निर्मितीसह एक लाख कोटींपर्यंत वार्षिक निर्यात वाढविण्याकरिता

- नारायण जाधव,  ठाणेराज्यात येत्या वर्षात माहिती तंत्रज्ञान उद्योगात ५० हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करून सुमारे १० लाख रोजगार निर्मितीसह एक लाख कोटींपर्यंत वार्षिक निर्यात वाढविण्याकरिता राज्य शासनाने आयटी उद्योगांसह एव्हीजीसी अर्थात अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्टस्, गेमिंग आणि कॉमिक्सउद्योगासाठी आपल्या माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत धोरणाद्वारे पायघड्या घातल्या आहेत. उद्योग विभागाने २००९ मध्ये जाहीर केलेल्या आयटी धोरणाचा कालावधी २८ आॅगस्ट २०१५ रोजी संपल्याने शासनाने महाराष्ट्राचे नवीन माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत धोरण २०१५ -२० मध्ये उपरोक्त उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेऊन साकारले असून त्यात आयटी उद्योगांना अनेक नव्या सवलती दिल्या आहेत. या धोरणाची मुदत आॅगस्ट २०१५ ते ३० जून २०२० पर्यंत राहणार आहे.राज्य भरातील विविध ललीत कला विद्यालये ही डिजिटल आर्ट सेंटर म्हणून ओळखली जातात. डिजिटल आर्ट व अ‍ॅनिमेशन हा अभ्यासक्रम विद्यापिठांच्या सहकार्याने राबविण्यासाठी आणि संबधित सेंटर पीपीपी मॉडेल अर्थात सार्वजनिक-खासगी भागिदारीत चालविण्यासाठी येणाऱ्या एकूण खर्चाच्या २५ टक्के निधी शासन देणार आहे. उर्वरीत निधी खासगी प्रवर्तकाने स्वत: उभारावयाचा असून राज्य शासनाचे अनुदान १० कोटीपर्यंत राहणार आहे.सध्याच्या चटईक्षेत्रात १०० ते २०० टक्केपर्यंत अतिरिक्त वाढ करून ते तीन पर्यंत करणे, त्यासाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड या महापालिका आणि अंबरनाथ पालिकांच्या क्षेत्रात प्रचलीत रेडी रेकनर दराच्या ३० टक्के अधिमूल्य आकारून तर उर्वरीत महाराष्ट्रात १० टक्के अधिमूल्य आकारुन चटईक्षेत्रास १०० ते २०० टक्के पर्यंत वाढ करण्यास परवानगी देणे, मात्र ते जास्तीत जास्त तीनपर्यंत ठेवण्यास मान्यता दिली आहे. यातील ८० टक्के बांधकाम क्षेत्र माहिती तंत्रज्ञान आणि एव्हीजीसी उद्योगांना ठेऊन उर्वरीत २० टक्के बांधकाम क्षेत्रावर पूरक उद्योगांना परवानगी दिली आहे.राज्यातील ना उद्योग जिल्ह्यांसह नक्षलग्रस्त क्षेत्रातील आयटी आणि एव्हीजीसी उद्योगांना तारण गहाण, मालमत्तेवरील प्रभार, भाडेपट्टा, गहाणखत आणि त्यावरील प्रतिभूतिंवर १०० टक्के मुद्रांक सूट देण्यास मान्यता दिली आहे. तर अ व ब प्रवर्गातील खासगी माहिती तंत्रज्ञान पार्कमधील नवीन व विद्यमान घटकांच्या विस्तारीत तंत्रज्ञान, सेझमधील उद्योगांना तारण गहाण, मालमत्तेवरील प्रभार, भाडेपट्टा, गहाणखत व्यवहारांरावर ७५ टक्के मुद्रांक शुल्क माफ केले आहे.सेझ मधील आयटी आणि एव्हीजीसी उद्योगांना १० वर्षे तर इतर भागातील उद्योगांना १५ वर्षे विद्युत शुल्क भरण्यातून सूट दिली आहे. तसेच नोदणी असलेल्या सर्व उद्योगांना वीजपुरवठा करण्यास शासनाने मान्यता दिली दिली आहे. वीज वापराच्या प्रति युनीट १ रुपया या दराने तीन वर्षांपर्यत होणारी रक्कम अथवा किंवा संबधित घटकाने नोंदणी घेण्याच्या दिवशी हार्डवेअर केलेली गुंतवणुकीची जी रक्कम यातील जी रक्कम कमी असेल तेवढे वीज अनुदान देण्यात येणार आहे.उद्योग संचलनालयाकडे नोंदणी असलेल्या या क्षेत्रातील सर्व उद्योगांना निवासी दराच्या सममूल्यदराने मालमत्ता कर आकारण्यास मान्यता दिली आहे.जकात कर, प्रवेशकर, एलबीटी किंवा त्या ऐवजी लावलेल्या अन्य उपकरातून सूट मिळणार आहे.मुंबई-पुणे येथे सार्वजनिक-खासगी भागिदारी पीपीपी मॉडेलवर आधारीत एव्हीजीसी सेंटर आॅफ एक्सलेन्स ची स्थापना करण्यास आणि त्यासाठी वित्तीय सहाय्य म्हणून येणारा भांडवली खर्च व उपकरणे खरेदीचा खर्च शासन पुरविणार आहे.आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत बाजारातील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी एव्हीजीसी उद्योगांना सुरवातीला ५० कोटीपर्यंत व्हेंचर कॅपिटल फंड उभारण्यास मान्यता दिली असून त्याच्या सहाय्यतेसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली शक्तीप्रदान समिती स्थापन केली आहे.राज्यात निर्मित झालेल्या आणि राज्यातील सिनेमागृहात प्रदर्शित झालेल्या अ‍ॅनिमेशन चित्रपटांना करमणूक करातून सूट देण्यात आली आहे.राज्यात स्टीरीओस्कोपीतून २ डीतून ३डी केलेल्या चित्रपटांना करमणूक कराच्या ५० टक्के अथवा अडीच कोटी रूपयापर्यंत परतावा देण्यात मिळणार आहे.ई कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रीयदृष्या करणे, नैसर्गिक स्त्रोतांचे संरक्षण करून हरीत माहिती तंत्रज्ञान केंद्र विकसित केल्यास विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे.दरवर्षी २० आॅगस्ट हा दिवस माहिती तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे.