शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कॅमेऱ्यात टिपला अनोखा सौंदर्याविष्कार!

By admin | Updated: March 19, 2017 03:40 IST

वरळीच्या लोढा सुप्रिमस येथील ‘लोकमत’ कार्यालयात आयोजित रचना दर्डा यांच्या छायाचित्रण प्रदर्शनाला दाद देण्यासाठी शनिवारी सायंकाळी कलारसिकांनी एकच गर्दी केली.

मुंबई : वरळीच्या लोढा सुप्रिमस येथील ‘लोकमत’ कार्यालयात आयोजित रचना दर्डा यांच्या छायाचित्रण प्रदर्शनाला दाद देण्यासाठी शनिवारी सायंकाळी कलारसिकांनी एकच गर्दी केली. केवळ निमंत्रितांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन ‘लोकमत’ समूहाचे एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांच्या हस्ते करण्यात आले. तर याप्रसंगी ‘लोकमत’ समूहाचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा आणि त्यांच्या पत्नी आशू दर्डा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन सोहळा पार पडला.महाराष्ट्रासह जगभरातील विविध वास्तूंचे सौंदर्य, स्थापत्यशास्त्र, प्रकाशाची किमया आणि देखणा निसर्ग आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून छायाचित्रकार रचना दर्डा यांनी अस्खलितपणे टिपला आहे. प्रवासादरम्यान जगभरातील पर्यटनस्थळांचा अनोळखी कोपरा आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करून एका वेगळ्या सौंदर्याविष्काराची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रदर्शनातील छायाचित्रांमध्ये दिसणारे वास्तुसौंदर्य, परंपरा आणि लोककला यांचे भाव कलारसिकांना भावणारे आहेत. कॅलिफोर्निया, दक्षिण आफ्रिका, केनिया, फ्रान्स, कॅनडा, काश्मीर, लंडन, हैदराबाद, राजस्थान अशा विविध ठिकाणांचे वेगळेपण कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला श्रीराम मिलचे मालक विकास कासलीवाल, एमको कंपनीचे अध्यक्ष राजेश जैन, एमको कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश जैन, ‘लोकमत कॉर्पोरेट’चे अध्यक्ष अरुण गेरा, कांतिलाल कोठारी, पूर्वा कोठारी, सुनीत कोठारी, अर्पिता अग्रवाल, रुचिरा दर्डा, रमेश अग्रवाल, रिखव शाह, अश्मी शाह, श्याम भंडारी, नितीन गांधी, टिना गांधी, डॉ. सागर शाह, डॉ. रेश्मा शाह, मीनाक्षी जैन, विकास नारायणन, तृप्ती नारायणन, अर्चना शेठ, रिषभ शेठ आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली. (प्रतिनिधी)