मुंबई : जात प्रमाणपत्र मिळवण्यात अडचण ठरणाऱ्या १९५० सालच्या वास्तव्याच्या अटीवर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. महालक्ष्मी येथे मंगळवारी पार पडलेल्या मुंबई मेघपाल पंचायतीच्या सामूहिक विवाह संमेलनात मुख्यमंत्री बोलत होते.फडणवीस म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे जात प्रमाणपत्र मिळवताना १९५० सालच्या वास्तव्याच्या अटीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे अॅटर्नी जनरलचे मत घेऊन त्यातून योग्य तो मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल. या वेळी आयोजित सामूहिक विवाह सोहळ्याचेही त्यांनी कौतुक केले. समूह लग्नसोहळ्यामुळे समाजात समता आणि समरसता वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारने पंतप्रधानांकडे मागणी केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत इंदू मिलची जागा बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी खासदार शंभूप्रसाद महाराजांसह अनेक साधु-संत आणि आमदार मंगल प्रभात लोढा व सुनील शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
‘जात प्रमाणपत्रातील जाचक अटी काढणार’
By admin | Updated: April 22, 2015 04:13 IST