शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल

By admin | Updated: May 19, 2016 06:25 IST

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बुधवारी सकाळी आपल्याच नातलगाचा मृतदेह असल्याचे समजून दुसऱ्याचा मृतदेह नेऊन अंत्यसंस्कार करण्याचा धक्कादायक प्रकार

सोलापूर : येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय तथा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बुधवारी सकाळी आपल्याच नातलगाचा मृतदेह असल्याचे समजून दुसऱ्याचा मृतदेह नेऊन अंत्यसंस्कार करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी शवविच्छेदन विभागातील कर्मचारी प्रकाश लोंढे याला निलंबित करण्यात आल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांनी दिली. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास नारायण चंद्रामप्पा चन्ना यांचा मृत्यू झाल्याने मृतदेह शवविच्छेदन विभागामध्ये आणण्यात आला होता. चन्ना यांच्या नातलगांना ‘बुधवारी शवविच्छेदन करून मृतदेह देण्यात येईल,’ असे डॉक्टरांनी सांगितले. त्यानुसार, आज (बुधवारी) सकाळी नातलग आल्यानंतर त्यांना नारायण चन्ना यांचा मृतदेह आढळला नाही. दरम्यान, चन्ना कुटुंबीय येण्यापूर्वी एक मृतदेह शवविच्छेदन विभागातून नेण्यात आला होता. यातून मृतदेहांची अदलाबदल झाल्याचा प्रकार प्रशासनाच्या लक्षात आला. कर्मचाऱ्यांनी चुकून शेखर यांचा मृतदेह देण्याऐवजी नारायण चन्ना यांचा मृतदेह दिवाण कुटुंबीयांना दिला. कुटुंबियांनीमृतदेह थेट मोदी स्मशानभूमीत नेला. दोन दिवसांपूर्वीचा मृतदेह असल्याने चेहरा न पाहता पायाचे दर्शन घेऊन विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार केले.पण घटना समजताच त्यांचा संताप अनावर झाला. दुपारपर्यंत कोणीच काही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हते. चन्ना कुटुंबीयांचा संताप अनावर झाला. सी. ब्लॉकमधील न्याय वैद्यकशास्त्र विभागात चन्ना कुटुंबीयांनी एकच गर्दी केली. (प्रतिनिधी)