शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
3
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
4
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
5
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
6
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
7
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
8
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
9
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
10
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
11
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
12
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
13
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
15
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
16
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
17
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
18
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य
19
धक्कादायक! 'पंचायत' फेम आसिफ खानला हृदयविकाराचा झटका, म्हणाला- "एका क्षणात सगळं बदललं..."
20
एक कोटी रुपये कमाई, तरीही तो दु:खी, सोशल मीडियावर मांडली व्यथा, म्हणाला, पैसा आहे पण...   

वसई पूर्वेतील मुख्य रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात

By admin | Updated: August 1, 2016 03:12 IST

एव्हरशाईन सिटी ते रेंजआॅफिस दरम्यानच्या मुख्य रस्त्यावरील वाढत्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा होत आहे.

वसई : वसई पूर्वेतील एव्हरशाईन सिटी ते रेंजआॅफिस दरम्यानच्या मुख्य रस्त्यावरील वाढत्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा होत आहे. एमएमआरडीने कोट्यावधी रुपये खर्च करुन या रस्त्याचे रुंदीकरण केले. परंतू सध्या रस्त्यावर खाजगी ट्रान्सपोर्ट, कार शो रुम मालकांकडून आपली वाहने उभी करण्यासाठी रस्त्याचा वापर केला जात असल्याने या ठिकाणी वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. या मुख्य रस्त्यावर चोवीस तास वाहनांची मोठी वर्दळ असते. मुंबई-अहमदाबाद महामार्ग व पुढे मुंबईकडे जाण्यासाठी वसईकरांना याच एकमेव मार्गाचा वापर करावा लागतो. यावेळी रस्तारुंदीकरणात ग्रामस्थांची जुनी घरे तसेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेली दुकाने तोडण्यात आली. जनहिताचेकाम होत असल्याने ग्रामस्थांनी त्याला विरोध न करता सहकार्य केले. परंतु आता रस्तारुंदीकरणाचा फायदा वाहनचालकांना, स्थानिकांना कमी व व्यापाऱ्यांंनाच जास्त होत आहे. या रस्त्याच्या बाजुला असलेले कार विक्रेते त्यांच्या नवीन व जुन्या गाड्या मुख्य रस्त्यावर पार्किंग करु लागले आहेत. अनेक गॅरेजनी रस्त्यावर धंदा थाटला आहे. तर काही ट्रान्सपोर्ट चालकांकडून या रस्त्याचा आपल्या बसेस उभ्या करण्यासाठी दुरुपयोग केला जात आहे. त्यामुळे हा रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. परिणामी सकाळ-संध्याकाळ या ठिकाणी वाहतुकीचा चक्का जाम होत असून वाहन चालकांचा वेळ व इंधनाच वाया जात आहे. (प्रतिनिधी)>स्थानिक संतप्त अवैध पार्र्किं ग न रोखल्यास होऊ शकते दुर्घटनावसई पूर्वेतील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ग्रामस्थांची घरे, जमिनी व दुकान ेगेली आहेत. अशा परिस्थितीत महापालिकेचे दुर्लक्ष व व्यापाऱ्यांनी रस्त्यावर केलेल्या अतिक्रमणांमुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष खदखदत आहे. मुख्य रस्त्यावर केल्या जात असलेल्या बेकायदा पार्किंगमुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. महापालिकेने या रस्त्यावरील वाहनांच्या पार्किंगवर प्रतिबंध न घातल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता देखील नाकारता येत नसल्याचे शिवसेना उपविभागप्रमुख नरेंद्र भोईर यांनी सांगितले. त्यामुळे पालिका प्रशासनाने अशा बेकायदा पार्क केलेल्या वाहनांवर तात्काळ कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे. पालिकेने कारवाई न केल्यास मात्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.