शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना मनोहर कदमचे प्रशिक्षण

By admin | Updated: June 19, 2016 05:03 IST

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना माजी पोलीस अधिकारी मनोहर कदम याने पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण दिल्याचा धक्कादायक संशय सीबीआयने व्यक्त केला आहे. कदम याने पोलीस

पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना माजी पोलीस अधिकारी मनोहर कदम याने पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण दिल्याचा धक्कादायक संशय सीबीआयने व्यक्त केला आहे. कदम याने पोलीस उपनिरीक्षक असताना १९९७ मध्ये घाटकोपरच्या रमाबाई नगरात उसळलेल्या दंगलीवेळी जमावावर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणात त्याला जन्मठेपही झाली होती. या प्रकरणातील संशयित सारंग अकोलकर याने केलेल्या एका ई-मेलमध्ये त्याच्या नावासह उल्लेख केला असल्याने त्यानेच या मारेकऱ्यांना प्रशिक्षण दिले होते, असा सीबीआयचा संशय आहे़ सीबीआयने १ जून रोजी सारंग अकोलकर याच्या शनिवार पेठेतील घरावर छापा घातला होता़ त्या वेळी घेतलेल्या झडतीत सीबीआयच्या हाती दोन ई-मेलची कागदपत्रे मिळाली होती़ पहिल्या ई-मेलमध्ये १५ हजार सेना उभारणे तसेच जत, फोंडा येथे प्रशिक्षण शिबिर याविषयीची माहिती दिली होती़ दुसऱ्या ई-मेलमध्ये मनोहर कदम याचा उल्लेख आहे़ त्यात त्याच्या दोन मोबाइल क्रमांकाचाही उल्लेख आहे़ मात्र, ज्या ई-मेलमध्ये सारंग अकोलकर याने त्याचा उल्लेख केला आहे, तो ई-मेल कधी केला होता़ त्यात नेमका काय उल्लेख आहे, त्यानंतर आणखी काही ई-मेलमध्ये त्यांचा उल्लेख आहे का, हे अद्याप उघड झालेले नाही़ राज्य राखीव दलाचा (एसआरपीएफ) निवृत्त पोलीस उपनिरीक्षक कदम याला रमाबाई नगरातील गोळीबार प्रकरणी २००९ मध्ये सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. मात्र त्यानंतर मुंबई हायकोर्टाने ही शिक्षा स्थगित करून मे २००९ मध्ये त्याला जामीन मंजूर केला होता. हाच कदम आता दाभोलकर हत्येशी कनेक्शन असल्याच्या संशयावरून पुन्हा चर्चेत आला आहे. (प्रतिनिधी)तीन अधिकारी रडारवरया प्रकरणी सीबीआय दोन निवृत्त पोलीस अधिकारी आणि सेवेत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याची चौकशी करत आहे़ सध्या सेवेत असलेल्या एका अधिकाऱ्याने सनातनवर काय कारवाई सुरू आहे, याची माहिती सनातनला दिल्याचा संशय सीबीआयच्या अधिकाऱ्यांना असून त्या दृष्टीनेही तपास केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे़