शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

मोफत नेत्र शिबिरात आठ हजार रूग्णांची तपासणी

By admin | Updated: October 27, 2016 08:50 IST

८ हजार गोरगरीब रूग्णांची मोफत नेत्र तपासणी करत गरज पडल्यास शस्त्रक्रियेचाही खर्च करून सामाजिक बांधिलकी जपल्याचे कौतुकास्पद काम येवल्यातील एका सेवाभावी संस्थेने केले आहे.

दत्ता महाले, ऑनलाइन लोकमत

येवला (नाशिक), दि. २७ -  सुमारे आठ हजार गोरगरीब रूग्णांची मोफत नेत्र तपासणी करत गरज पडल्यास शस्त्रक्रियेचाही खर्च करून सामाजिक बांधिलकी जपल्याचे कौतुकास्पद काम येवल्यातील एका सेवाभावी संस्थेने करत समाजासमोर एक आदर्श घालून दिला आहे. येवला येथील डमाळे मित्र मंडळ, मानव कल्याण हितवादी सेवाभावी संस्था मुंबई व एच. पी. देसाई आय केअर हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. या अंतर्गत शस्त्रक्रिया शिबिरात ८ हजार रुग्णांच्या तपासण्या तर ३०० रुग्णांवर शस्त्रक्रिया पूर्ण होऊन अजून ३०० शस्त्रक्रिया पुणे येथे करण्यात येणार आहे. मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन टप्प्या टप्प्याने ४० गावात करण्यात आले होते. अजूनही ठिकठिकाणी हे शिबिर सुरू आहे. विशेष म्हणजे गावोगाव झालेल्या या शिबीराचा शुभारंभ स्थानिक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला होता. शिबिराचा पहिला टप्पा फेब्रुवारी महिन्यात पार पडला. यामध्ये सुमारे ४,५०० तपासण्या तर २५० रुग्णांवर शस्त्रक्रिया झाल्या होत्या. तसेच १० आॅक्टोबर पासून सुरु झालेल्या शिबीराच्या दुसऱ्या टप्प्यात सुमारे ४ हजार तपासण्या होऊन सुमारे ४०० रुग्ण शस्त्रक्रियेकरीता पात्र ठरले आहे. यापैकी ४० रूग्णांच्या पुणे येथील एच. व्ही. देसाई आय केअर हॉस्पिटल येथे पहिला ग्रुपच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या आहेत. या रूग्णांना बसने पुणे येथे रवाना करण्याकरीता सामाजिक कार्यकर्ते बाबा डमाळे, झुंजार देशमुख, सुर्यभान जगताप, विनोद बागुल, डॉ. सुधाकर भागवत,संतोष घोडेराव, बाळासाहेब खांदेशी, अमोल सोनवणे, कुणाल धुमाळ, खंडू साताळकर, रावसाहेब मगर, भागीनाथ थोरात, आदी मान्यवर उपस्थित होते. उर्वरीत गरजू रु ग्णांवर दिवाळीनंतर शस्त्रिक्र या करण्यात येणार आहे. नेत्रिवकाराने ग्रासलेल्या रुग्णांचे मोठे प्रमाण असल्यामुळे ही सेवा वारंवार करण्याचा निर्धार डमाळे यांनी व्यक्त केला.