शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकांची परवान्यासाठी ‘मराठी’त परीक्षा

By admin | Updated: March 1, 2016 00:56 IST

लॉटरी पद्धतीने रिक्षाचा परवाना मिळालेल्या उमेदवारांच्या परवान्यासाठी मराठी भाषा ज्ञानचाचणी सुरू झाली. परिवहन विभागाकडून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार सोमवारपासून

चिखली : लॉटरी पद्धतीने रिक्षाचा परवाना मिळालेल्या उमेदवारांच्या परवान्यासाठी मराठी भाषा ज्ञानचाचणी सुरू झाली. परिवहन विभागाकडून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार सोमवारपासून (दि. २९) प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) ही चाचणी घेण्यात आली. जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ठरवून दिलेल्या दिवशी परवानाधारकांची चाचणी, कागदपत्रांची तपासणी, तसेच शुल्क भरून घेतले, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली. राज्य शासनाकडून रिक्षापरवाना वाटप करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार, पिंपरी-चिंचवड विभागात ५४६ परवाने वाटप केले जाणार आहेत. ज्यांना लॉटरीचा परवाना मंजूर झाला आहे, त्यांच्या कागदपत्रांच्या पडताळणीचे काम पूर्ण झाले आहे. मोटर वाहन अधिनियमातील तरतुदीनुसार, अर्जदारास मराठी भाषेचे ज्ञान आहे की नाही, हे तपासण्यासाठी ही चाचणी घेतली गेली. पिंपरी-चिंचवड विभागात २९ फेब्रुवारीला १०० अर्जदारांची चाचणी घेण्यात आली. त्यांपैकी ९९ अर्जदार उपस्थित होते. उमेदवाराला मराठी पाठ्यपुस्तकातील एक परिच्छेद वाचण्यासाठी देण्यात आला. ज्या उमेदवारांना वाचन येत नसेल, अशांना शहर परिसरातील भौगोलिक माहितीचे १० प्रश्न विचारण्यात आले. याचे चित्रीकरण करण्यात आले. मोटार वाहन निरीक्षक व अनुभवी वार्ताहरांच्या उपस्थितीत ही चाचणी घेण्यात आली. या वेळी उमेदवारांकडून कागदपत्रे व परवाना शुल्काचा डीडी घेण्यात आला. उत्तीर्ण उमेदवारांना पुढील आठवड्यात परवान्याचे वाटप केले जाणार आहे. कागदपत्रे अपूर्ण असल्यास परवाना वाटप केले जाणार नाही. रिक्षाचालकांचे ज्ञान तपासण्यासाठी ही परीक्षा घेतली जात आहे. त्यामुळे चालकांनाही परीक्षेची तयारी करावी लागत आहे. (वार्ताहर)मराठी भाषेचे ज्ञान असल्याबाबत चाचणी घेण्याचे काम सुरू असून, यासाठी जबाबदार प्रादेशिक परिवहन अधिकारी व अनुभवी वार्ताहर यांच्या समक्ष परवाना लॉटरी विजेत्या उमेदवारास पाठ्यपुस्तकातील उतारा वाचण्यास सांगितले जाते. २००६ च्या अगोदर बॅच काढला असेल व उमेदवार निरक्षर असेल, तर त्यास परिसरातील भौगोलिक माहितीचे १० प्रश्न विचारले जातील. अर्जदाराला ज्या दिवशी बोलावले आहे, त्याच दिवशी येणे बंधनकारक आहे. कोणत्याही कारणास्तव त्यांना मुदतवाढ दिली जाणार नाही. - अजित शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्थानिक लोकांसाठी हा चांगला निर्णय आहे. परप्रांतीयांना परवाना वाटप होण्याचे प्रमाण कमी होईल. पारदर्शक कारभार असल्याने चाचणी देण्यास कसलीही अडचण आली नाही. - नीलेश बोरगे, लॉटरी विजेता उमेदवार