शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

‘कट आॅफ’ फुगलेल्या महाविद्यालयांची तपासणी

By admin | Updated: July 2, 2016 02:02 IST

खासगी कोचिंग क्लासेसशी असलेल्या छुप्या करारामुळे शहरातील काही कनिष्ठ महाविद्यालयांचे अकरावीचे कटआॅफ वाढले आहे.

पुणे : खासगी कोचिंग क्लासेसशी असलेल्या छुप्या करारामुळे शहरातील काही कनिष्ठ महाविद्यालयांचे अकरावीचे कटआॅफ वाढले आहे. त्यामुळे सोयीसुविधा, गुणवत्ता नसलेल्या या महाविद्यालयांचे हे फुगलेले कट आॅफ पाहून विद्यार्थी प्रवेश घेत असल्याचे त्यांची फसगत होत आहे. हे रोखण्यासाठी अशा ‘कट आॅफ’ फुगलेल्या महाविद्यालयांची स्वतंत्र पथकांमार्फत तपासणी केली जाईल, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक एन. के. जरग यांनी दिली.अकरावी प्रवेशाची आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. या प्रक्रियेतील पहिल्या फेरीचे विविध महाविद्यालयांचे कट आॅफ नुकतेच जाहीर करण्यात आले. मागील काही वर्षांपासून आवश्यक सोयीसुविधा नसलेल्या काही कनिष्ठ महाविद्यालयांचे ‘कट आॅफ’ वाढताना दिसत आहे. या वर्षीही ही स्थिती कायम राहिली आहे. खासगी कोचिंग क्लासेसशी छुपा करार आणि प्रात्यक्षिक व ७५ टक्के हजेरीतून सवलत देणाऱ्या महाविद्यालयांबाबतही हे घडत आहे. याबाबत ‘लोकमत’ सातत्याने पाठपुरावा केला आहे. क्लासेसशी करारानुसार काही महाविद्यालयांपासून मिळणाऱ्या सवलतीमुळे अनेक गुणवत्ताधारक विद्यार्थी सोयी-सुविधा, गुणवत्ता नसलेल्या महाविद्यालयांमध्येही प्रवेश घेतात. त्यामुळे या महाविद्यालयांचे कट आॅफ वाढते. पुढील वर्षी हेच कट आॅफ पाहून विद्यार्थी संबंधित महाविद्यालयात प्रवेशासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांची या फुगीर कट आॅफमुळे फसगत होत आहे.याबाबत शिक्षण विभागाकडून कडक पावले उचलली जाणार आहेत. या कनिष्ठ महाविद्यालयांना अचानक भेटी देवून हजेरीपटाची तपासणी केली जाणार आहे. याविषयी ‘लोकमत’शी बोलताना जरग म्हणाले, अचानक कटआॅफ वाढलेल्या महाविद्यालयांचे अभिनंदन करायला हवे. पण हे कट आॅफ अचानक कसे वाढले, याची तपासणी केली जाईल. त्यासाठी स्वतंत्र पथके नेमून संबंधित महाविद्यालयात पाठविली जातील. (प्रतिनिधी)