आंबेगाव : डोंगराचा ढिगारा उपसण्यात किती दिवस लागतील, याविषयी आज रात्री तरी अनिश्चिता होती. दुर्घटनेनंतर काही वेळेतच त्या गावात पोहोचलेल्या साईदीप ढोबळे या तरुणाने सांगितले, की एकाच क्षणात गावाचे होत्याचे न्हवते, अशी स्थिती झाली. मृतदेह बाहेर काढण्यासाठी अरूंद जागा असल्यामुळे दोनच जेसीबीच्या साहाय्याने ढिगारा बाजूला काढण्याचे काम सुरू केले आहे. मृतांपैकी कोणाचे शीर नाही, हात किंवा पाय नाही, अशी भयानक अवस्था आहे. दरम्यान, सायंकाळी ६ नंतर अंधार, पावसाच्या सरी, बघ्यांची गर्दी आणि सुमारे १०० हून रुग्णवाहिका, तसेच चारचाकी वाहने यामुळे मदतकार्यात अडथळे येत होते. यदुनाथ चौधरी या आणखी एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले, की सकाळी १०.३० च्या सुमारास मी गावात पोहोचलो, तेव्हा चार मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. ज्या वेळी डोंगर कोसळला त्या वेळी शेताकडे गेलेली लोक बचावले. पाऊस चांगला झाला असल्यामुळे भातलावणी करण्यासाठी ऐरवी बाहेर असणारे लोकही गावात मुद्दाम आले होते. त्यांच्यापैकी ५ ते ६ जण देवळात झोपले होते. त्या देवळाचा आता फक्त कळस दिसतो आहे.
मृतांची नेमकी संख्या अनिश्चित
By admin | Updated: July 31, 2014 11:03 IST