शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

द्रुतगती मार्गावर माजी सैनिकांची सुरक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2016 01:07 IST

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतुकीला शिस्त लावणे आणि वाढते अपघात रोखण्यासाठी आता पोलिसांबरोबर माजी सैनिकांचाही पहारा राहणार आहे.

राजानंद मोरे,  पुणेपुणे : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतुकीला शिस्त लावणे आणि वाढते अपघात रोखण्यासाठी आता पोलिसांबरोबर माजी सैनिकांचाही पहारा राहणार आहे. कळंबोली ते वडगाव मावळ या ९४ किलोमीटरच्या हद्दीत सुमारे १२० माजी सैनिक वाहतूक नियंत्रक म्हणून गस्त घालणार आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत ही योजना आखण्यात आली आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी महामंडळाकडून पहिल्यांदाच माजी सैनिकांची मदत घेतली जाणार आहे. मागील काही महिन्यांत द्रुतगती महामार्गावर जीवघेण्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. प्रामुख्याने लेन कटिंग, अतिवेग, रस्त्याच्या कडेला बेकायदा थांबा या कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होत असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर महामार्गावर विशेष रस्ते सुरक्षा मोहीम राबविण्यात आली. या काळात रस्ते विकास महामंडळ व महामार्ग पोलिसांनी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी विविध उपाययोजना केल्या होत्या. ही मोहीम प्रभावीपणे कायमस्वरूपी राबविण्यासाठी सध्या महामार्ग पोलिसांसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. हे विचारात घेऊन रस्ते विकास महामंडळाने पोलिसांना अतिरिक्त मनुष्यबळ पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ (मेस्को) व महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाशी पत्रव्यवहार करण्यात आला असून मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.‘मेस्को’ला पाठविलेल्या पत्रात ‘वाहतूक नियमन करण्यासाठी १२० वाहतूक नियंत्रकांची नेमणूक करण्याचे नियोजन आहे. महामार्गावरील कळंबोली, पळसपे, बोरघाट, खंडाळा, वडगाव मावळ या पोलीस मदत चौकीअंतर्गत त्यांना नेमण्यात येणार आहे’, असे नमूद केले आहे. कळंबोलीपासून वडगाव या ९४ किलोमीटरच्या हद्दीत या माजी सैनिकांची ठरावीक अंतरावर नेमणूक करण्याचे प्रस्तावित आहे.