शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएममध्ये घोळ शक्यच नाही!

By admin | Updated: March 7, 2017 04:25 IST

इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये (ईव्हीएम) कोणताही घोळ करता येत नाही.

नागपूर : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये (ईव्हीएम) कोणताही घोळ करता येत नाही. पराभूत झालेल्या उमेदवारांकडून याबाबतचा आरोप करण्यात येत असला तरी हा विषय भाजपाचा नाही. राज्य निवडणूक आयोगाने याबाबत निष्पक्ष चौकशी करावी, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले.नागपुरात एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या दानवे यांनी सोमवारी लोकमत भवन येथे सदिच्छा भेट दिली आणि संपादकीय सहकाऱ्यांशी राज्यातील निवडणूक निकालावर चर्चा केली. यापूर्वी लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी रावसाहेब दानवे व खासदार कपिल पाटील यांचे स्वागत केले. भाजपाचे संघटन व राज्य सरकार यात कुठलेच मतभेद नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात पार्टीचा चेहरा बनले आहे, असे सांगून दानवे म्हणाले, मुंबईत पक्षाला सर्वच समाजाची मते मिळाली आहेत. इतकेच नाही तर भाजपाने मुंबईत शिवसेनेच्या मराठी ‘व्होट बँके’ला सुरुंग लावला. परळीतील पराभवानंतर महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत दानवे म्हणाले की, पक्ष त्यांच्यासोबत आहे. या पराभवावर मंथन केले जाईल. तिथे कोण कुठे कमी पडले, यावर बैठकीत सविस्तर चर्चाही होईल. (प्रतिनिधी)>शिवसेनेशी वैचारिक मतभेद नाहीमुंबई महापालिकेत महापौरपदासाठी भाजपाने शिवसेनेला वॉकओव्हर देण्याचा घेतलेल्या निर्णयावर दानवे म्हणाले की, दोन्ही पक्षांमध्ये वैचारिक मतभेद नाही. काही बाबतीत त्यांची भूमिका वेगळी आहे. परंतु हिंदुत्वाच्या मुद्यावर दोन्ही पक्षाचे एकच मत आहे.एकमेकांविरुद्ध निवडणुका लढल्यानंतर परत एकत्र येण्यासंदर्भात बोलताना दानवे म्हणाले की, शिवसेनेने जेव्हा भाजपाला आपली ताकद वाढल्याचा हवाला दिला तेव्हा हिंगोली, बुलडाणा, रामटेक, ठाणे या लोकसभेच्या जागा भाजपाने सोडून दिल्या.परंतु भाजपाची ताकद वाढली तेव्हा शिवसेना जागा सोडण्यास तयार नव्हती. अशा परिस्थितीमुळे दोन्ही पक्षांना एकमेकांना ताकद दाखविण्यासाठी विरोधात निवडणुका लढवाव्या लागल्या.>विरोधकांनी कार्यकर्त्यांना दूर केलेकाँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांनी कार्यकर्त्यांना दूर लोटले. निवडणुकीदरम्यान दोन्ही पक्षामध्ये असंतोष दिसून आला. त्याचा फायदा भाजपाला मिळाला. आता काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपल्या भविष्याबाबत चिंता व्यक्त करीत आहेत.