शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यामध्ये सर्वत्र चक्काजाम

By admin | Updated: February 1, 2017 05:44 IST

मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल करावा, या आणि इतर मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याकरिता सकल मराठा समाजाने मराठा क्रांतिमोर्चाच्या

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल करावा, या आणि इतर मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याकरिता सकल मराठा समाजाने मराठा क्रांतिमोर्चाच्या बॅनरखाली मंगळवारी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन केले. औरंगाबाद व नांदेड येथे झालेला लाठीमार, सेनगावला झालेली दगडफेक आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जाळपोळीच्या घटना वगळता, अन्यत्र आंदोलन शांततेत व शिस्तीत पार पडले. आंदोलनात महिला आणि युवक-युवतींचा सहभाग लक्षणीय होता. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी द्यावी, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल व्हावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी, या प्रमुख मागण्यांसाठी आज राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सकाळी ९ वाजल्यापासून आंदोलनकर्ते रस्त्यावर ठिय्या मांडून होते. त्यामुळे बघता-बघता राज्यातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली. मुंबईतील प्रवेशद्वारांवरच वाहतूक अडविण्यात आल्याने चाकरमानी मंडळी अडकून पडली. अकोला येथील आनंद गवई आणि माना येथील संजय खंडारे या दोन शहीद जवानांचे पार्थिव ३१ जानेवारी रोजी अकोल्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली होती, त्यामुळे अकोल्यातील आंदोलन स्थगित करण्यात आले होते.यापुढे अनावश्यक प्रतिज्ञापत्र नकोमराठा आरक्षणाविरोधात व समर्थनार्थ दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर २७ फेब्रुवारीपासून अंतिम सुनावणीस सुरुवात होणार आहे. मात्र, आता यापुढे कोणत्याही याचिकाकर्त्याने किंवा प्रतिवाद्याने अनावश्यक प्रतिज्ञापत्र दाखल करू नये, असे उच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले.राज्य सरकारने २०१४ मध्ये मराठा व मुस्लीम समाजाला सरकारी नोकरी व शैक्षणिक क्षेत्रात अनुक्रमे १६ व पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला केतन तिरोडकर व अनेक संस्था व संघटनांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले, तर या आरक्षणाच्या समर्थनार्थही अनेक याचिका दाखल करण्यात आल्या. मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे या याचिकांवर मंगळवारी सुनावणी होती. मंगळवारच्या सुनावणीत अ‍ॅड. गुणरतन सदावर्ते यांनी सरकारच्या भूमिकेत बदल असल्याचे खंडपीठाला सांगितले.