शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

जिल्ह्यात सर्वत्र ‘मोरया... मोरया’चा गजर

By admin | Updated: September 5, 2016 03:10 IST

काही तासांवर आलेल्या बाप्पाच्या आगमनानिमित्त रविवारी बाजारपेठा तुडुंब गर्दीने फुलून गेल्या होत्या.

पालघर/वसई : काही तासांवर आलेल्या बाप्पाच्या आगमनानिमित्त रविवारी बाजारपेठा तुडुंब गर्दीने फुलून गेल्या होत्या. आयताच सुटीचा दिवस असल्याने शहरातील प्रमुख बाजारपेठेमध्ये खरेदीला उधाण आले होते. एरव्ही, एकट्यादुकट्याने होणारी खरेदी सहकुटुंब होताना पाहायला मिळाली. प्रामुख्याने मखर, फुल-हार-पूजेचे साहित्य, किराणा मालाच्या खरेदीसाठी झुंबड उडाली होती.गणपती हा लहानग्यांचा आवडता असल्याने तसेच आदल्या दिवशी सुटी आल्याने बाजारपेठेमध्ये तिप्पट गर्दी उसळल्याचे पाहायला मिळाले. पालघर जिल्ह्यातील पालघर, बोईसर, वसई, विरार, नालासोपारा, विक्रमगड, वाडा, जव्हार, तलासरी, मोखाडा, मनोर या प्रमुख बाजारपेठांमध्ये सायंकाळपर्यंत गर्दीचा उच्चांक पाहायला मिळाला. यंदा महागाईची झळ कायम असतानाही बाप्पासाठी भक्तांनी हात आखडता न घेता सैल सोडल्याने बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली.छोटेखानी दुकानांपासून, किराणा स्टोअर, मिठाईवाले, सुपर मार्केट, नॉव्हेल्टी स्टोअर, सर्वांच्या ठिकाणी ग्राहकांची मांदियाळी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे बाजारातील कासारांकडे महिलावर्ग हिरव्या, लाल, पिवळ्या, निळ्या, पोपटी रंगाचे चुडे भरण्यासाठी गर्दी करताना दिसल्या. हरतालिकापुजनासाठी महिलांकडून फुलखरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याने खरेदीविक्रीमध्ये तेजी जाणवली. प्रत्येक जण हार, तुरे, तोरणे, पुष्पगुच्छ, नारळ घेत होते. देवाला पाच फळे खरेदीसाठी मोठी मागणी असल्याने फुलांपाठोपाठ फळांच्या विक्रीतही तेजी पाहायला मिळाली. गणपतीच्या आरासासाठी मखर खरेदी किंवा स्वत: सजावट करणाऱ्या तरुण, तरुणींची गर्दी बाजारपेठेमध्ये होती. यंदा मखराचे विविध प्रकार तसेच इको फे्रण्डली कन्सेप्ट बाजारात आल्याने अनेकांनी आपापल्या परीने खरेदी केली. इलेक्ट्रॉनिक्स प्रकारामध्ये चायनापाठोपाठ भारतीय कंपन्यांनीही आपले प्रॉडक्ट उतरवल्याने वैविध्य पाहायला मिळाले. रेडिमेड मखरांमध्ये बंगाली कलाकारांनी बनवलेल्या कलाकृतींनी आपले वेगळेपण दाखवल्याने खरेदी करताना अनेक पैलू पाहायला मिळाले. आदिवासींना मिळाला रोजगारगणपतीपुजनासाठी शमी, दूर्वा, पत्री, विड्याची पान, केवडा, केळीची पाने यांची विक्री सकाळपासून सुरू असल्याने आदिवासी महिलांना मोठा रोजगार मिळाला. स्थापनेच्या दिवशी गावठी भाज्यांचे नैवेद्य बाप्पाला दाखवण्याचा प्रघात असल्याने पूजा साहित्याबरोबरच भाज्यांचे दरही वधारलेले होते. (प्रतिनिधी)>मनोरमध्ये ४८४ बाप्पांचे आगमनमनोर येथील पन्नास गावांमध्ये वाजतगाजत, गुलाल उधळत तब्बल ४८४ गणपती बाप्पांचे आगमन झाले असून कुणी रिक्षामध्ये तर कोणी कार, जीप, टेम्पो, ट्रकमध्ये मूर्ती घेऊन जाताना दिसत होते. गणपती बाप्पा मोरयाच्या गजराने परिसर दणाणून गेला होता. दरवर्षाप्रमाणे यंदाही आदल्या दिवशीच घरोघरी व सार्वाजनिक मंडळांनी गणपती बाप्पाना वाजतगाजत आणले. रविवारी सावरे, येंबूर, करलंगाव, टाकव्हल, दुर्वेस, हलोली, बोट, दहिसर, ढेकळे, मासवन, धुकटन, भाडोली, नागजरी, नेहे, नांदगाव असे ५० ते ६० गावांतील १५० सार्वजनिक मंडळे व ३३४ घरगुती गणेशभक्तांनी मोठ्या उत्साहात गणेशमूर्ती रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांतून मार्ग काढत सुखरूप घेऊन गेले.शाडू मातीच्या गणेशमूर्तीलाही मोठ्या प्रमाणात मागणी दिसत होती. तसेच मनोर बाजारपेठेत सजावट रोषणाईसाठी वस्तू घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. तर, महिलांनी पूजेचे सामान, मोदक घेण्यासाठी दुकानात गर्दी केली होती.>विक्रमगडमध्ये ४२५ ठिकाणी होणार स्थापनासुखकर्ता, दुखहर्ता गणरायाची सोमवार, ५ सप्टेंबर रोजी विधीवत स्थापना होणार असून गणरायाच्या स्वागतासाठी संपूर्ण तालूका सज्ज झाला आहे. यावर्षी पोलिस स्टेशन परिक्षेत्रात एकंदरित १२० ठिकानी गणेश मंडळांकडून तर ३०५ घरगुती ‘बाप्पा’ची स्थापना होणार आहे.