शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

अनुसूचित जाती, जमातींचा सन्मान जपणे प्रत्येकाचे कर्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 05:16 IST

उच्च न्यायालय : तिरस्काराने वागवल्यामुळे प्रतिष्ठा, सन्मान हरवल्याचे नोंदवले निरीक्षण

मुंबई : दुकानातील बाटलीतून खाऊ न विचारता घेतल्याने दोन अल्पवयीन मुलांची नग्न धिंड काढणाऱ्या दोघांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळला. तिरस्काराने वागल्याने अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील सदस्यांची प्रतिष्ठा, त्यांचा सन्मान हरवला आहे. त्यांचा सन्मान आणि स्वाभिमान जपणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले.इरफान पठाण व सलीम मेहमूद पठाण यांची सत्र न्यायालयाने जामिनावर सुटका करण्यास नकार दिल्यानंतर या दोघांनीही उच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. ए. एम. बदार यांच्या खंडपीठापुढे या जामीन अर्जांवर सुनावणी होती. या दोघांवरही अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (प्रिव्हेन्शन आॅफ अ‍ॅट्रॉसिटी) अ‍ॅक्ट व पॉक्सोअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.‘अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील सदस्यांचा सन्मान आणि स्वाभिमान जपणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. मात्र, त्यांच्यावरील अत्याचारांत वाढ झाली आहे. अशा प्रकारे तिरस्काराने वागवल्यामुळे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमधील सदस्यांची प्रतिष्ठा आणि सन्मान हरवला आहे,’ असे न्यायालयाने म्हटले.या केसमध्ये दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रावरून मुलांवर अत्यंत वाईट प्रकारे अत्याचार केले असल्याचे दिसते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.गेल्या वर्षी मे महिन्यात ठाणे पोलिसांनी इरफान पठाण आणि सलीम मेहमूद पठाण यांना अटक केली. ८ व ९ वर्षांच्या दोन मुलांनी त्यांच्या दुकानातील बाटलीतून खाऊ घेतला होता. मात्र हा खाऊ त्यांना न विचारता या मुलांनी घेतल्याने आरोपींनी रागाच्या भरात या मुलांना नग्न करून त्यांची धिंड काढली होती.मुलांना नग्न करून त्यांच्या धिंड काढण्यासोबतच त्यावेळी या मुलांच्या गळ्यात चपलेचा हारदेखील अडकवण्यात आला होता. यादरम्यान या मुलांना मारहाणही करण्यात आली होती. केवळ खाऊ पळवल्यामुळे या मुलांना अशाप्रकारची वाईट शिक्षा करण्यात आली होती. ही दोन्ही मुले अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील आहेत.जामीन अर्ज फेटाळलाजामीन अर्जावर युक्तिवाद करताना पठाण यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, या कायद्याअंतर्गत दोषी सिद्ध झाल्यास पाच वर्षांच्या कारावासाची तरतूद आहे. आरोपींनी आधीच १७ महिने कारागृहात काढले आहेत. त्यामुळे त्यांची जामिनावर सुटका करण्यात यावी. मात्र, आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे, असे म्हणत न्यायालयाने दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय