नाशिक : शिवसेना-भाजपात अनेक दिवस चर्चा होऊन महायुती तुटली. आमच्यात प्रत्यक्षात एकच बैठक झाली. त्यातही निर्णय झाला नाही. आता सर्व प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे लढणार असल्याने प्रत्येकाला खरी शक्ती कळेल, असे राष्ट्रवादीचे नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी केला.ठरलेल्या सूत्रानुसार कार्यवाही होण्याआधीच काँग्रेसने राष्ट्रवादीच्या दोन जागांवर उमेदवार घोषित केले. त्यामुळे आघाडी तुटण्यास काँग्रेसच जबाबदार असल्याचा आरोपही भुजबळ यांनी केला. देवीदास पिंगळे व शिवाजी चुंबळे यांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता पत्रकारांशी बोलत होते. आम्हाला सर्व २८८ जागी उमेदवार उभे करावे लागणार असून, आमची तशी तयारी आहे. (प्रतिनिधी)
प्रत्येकाला खरी शक्ती कळेल - भुजबळ
By admin | Updated: September 27, 2014 04:45 IST