शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अणुऊर्जेकडे सर्वांनी गांभीर्य पाहायला हवे

By admin | Updated: January 6, 2015 02:20 IST

आण्विक ऊर्जाविषयक संशोधन विकास जगभर सुरू असून त्याबाबतच्या माहितीची देवाणघेवाण करणे ही आजची नितांत गरज बनली आहे,

मुंबई : आण्विक ऊर्जाविषयक संशोधन विकास जगभर सुरू असून त्याबाबतच्या माहितीची देवाणघेवाण करणे ही आजची नितांत गरज बनली आहे, असे मत इंडियन सायन्स काँग्रेसच्या सोमवारी तिसऱ्या दिवशी झालेल्या अणुऊर्जाविषयक परिसंवादात तज्ज्ञांनी व्यक्त केले. ऊर्जा पुरवठा सातत्याने करता यावा यासाठी अणुऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा फायदा घेणे निश्चितच हितकारक ठरेल, असे प्रतिपादन फ्रेंच आल्टरनेटिव्ह एनर्जी अ‍ॅण्ड आॅटोमिक एनर्जी संस्थेचे बर्नार्ड बिगॉट यांनी केले. अणुऊजेर्बाबत लोकांना अनेक समस्या, अडचणी वाटत असल्या तरी आपण अणुऊर्जेच्या फायद्यांबाबत लोकांना समजावून सांगितले पाहिजे. किंबहुना त्याशिवाय आपल्याकडे पर्यायच उपलब्ध नाहीत, ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणूनच अणुऊर्जाविषयक संशोधन व विकास याबाबतची देवाणघेवाण करणे आवश्यक आहे. याबाबतचे ज्ञान जगभरात पोहोचविणे हेही तितकेच गरजेचे आहे, असेही बिगॉट यांनी यावेळी परिसंवादात नमूद केले. अणुऊर्जाविषयी समग्र आणि वैश्विक दृष्टिकोन - वर्तमान आणि भविष्य या विषयावरील परिसंवादाचे अध्यक्षपद अणुऊर्जातज्ज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी भूषविले. अन्य वक्त्यांमध्ये आयआयटी मुंबईचे एस. पी. सुखात्मे, भाभा अणुसंशोधन केंद्राचे शेखर बासू, गांधीनगरस्थित इन्स्टिटयूट आॅफ प्लाज्मा रिसर्चचे धीरज बोरा, अणुऊर्जा विभागाचे आर. के. सिन्हा आणि कौन्सिल आॅन एनर्जी, एनव्हायरन्मेंट अ‍ॅण्ड वॉटर या संस्थेचे अरूनभ घोष यांचा समावेश होता. अणुऊर्जा आणि त्याची गरज यावर सुखात्मे म्हणाले की, आपण चुकीच्या लोकांना सवलतीमध्ये वीज देतो.अधिक श्रीमंत लोकांसाठी विजेचे अधिक दर यानुसार विविध आर्थिक स्तरांतील लोकांसाठी निरनिराळे विजेचे दर आकारले गेले पाहिजेत. बासू यांनी अणुऊजेर्चा आरोग्यसुविधा, कर्करोग उपचार, औषधोपचार यामधील वापर कसा करता येईल यावर विवेचन केले. (प्रतिनिधी) विविध देशांना ऊर्जा पुरवठ्याची गरज भासत असून त्याची पूर्तता करणे हे सहजसोपे नाही. ऊर्जेसाठी आपण खनिजरूपी इंधनावर तब्बल ८0 टक्के अवलंबून असलो तरी अनेक कारणांनी ही खनिजरूपी ऊर्जा कायमस्वरूपी आपल्याला मिळू शकणार नाही.