शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
3
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
4
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
5
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
6
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
7
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
8
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
9
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
10
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
11
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
12
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
13
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
14
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
15
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
16
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
17
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
18
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
19
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
20
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष

प्रत्येकाने मराठीचा आग्रह धरावा

By admin | Updated: May 17, 2015 01:06 IST

भाषेची नाळ संस्कृतीशी निगडित असते. आपल्या संवेदनांसह विचार मांडण्यासाठी मातृभाषा महत्त्वाची आहे. यासाठी प्रत्येक मराठी माणसाने मराठी भाषेचा आग्रह धरायला हवा,

पिंपरी : भाषेची नाळ संस्कृतीशी निगडित असते. आपल्या संवेदनांसह विचार मांडण्यासाठी मातृभाषा महत्त्वाची आहे. यासाठी प्रत्येक मराठी माणसाने मराठी भाषेचा आग्रह धरायला हवा, असे मत राज्याच्या भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले. महापालिकेच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्त आयोजित कार्यक्रमात ‘मराठी संवर्धन’ या विषयावर ते बोलत होते. यमुनानगर, निगडी येथे स्पर्धा परीक्षा केंद्रात शुक्रवारी कार्यक्रमाचे उद्घाटन आयुक्त राजीव जाधव यांच्या हस्ते झाले. प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे, कामगार कल्याण अधिकारी चंद्रकांत इंदलकर, केंद्रातील विद्यार्थी उपस्थित होते.डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात मराठी माणसे आहेत. परंतु, त्यांचे वार्षिक अहवाल इंग्रजीमध्ये तयार करण्यात येतात. अनेक कारखान्यांमध्ये इंग्रजीत कारभार चालतो. बँकांमध्येही मराठीचा वापर होत नाही. जीवनाच्या सर्व क्षेत्रांत मराठीचा वापर झाला, तरच ती अधिक समृद्ध होईल. मातृभाषा ही विचार व ज्ञानप्रक्रियेशी निगडित असल्याने महत्त्वाची आहे. आपणच आपल्या भाषेचे मारेकरी होत आहोत. जगातल्या असंख्य भाषा शिकायला हरकत नाही. मातृभाषा अनेक अर्थाने महत्त्वाची असते. मातृभाषेत व्यवहार करणे गरजेचे आहे. भाषेमध्ये सतत बदल होत आहेत. मात्र , भाषेची स्वत:ची ठेवण असते व ती कायम असते. मध्ययुगात ज्ञानवृद्धी होत नव्हती. ज्ञान जातीजातीमध्ये बंदिस्त होते. त्यामुळे साचलेपण आले होते. बाराव्या शतकातील, शिवकालीन व आताची मराठी यामध्ये बदल झालेले असले, तरी भाषेची ठेवण तीच असल्याने त्याचे संवर्धन करायला हवे. ’’४ आयुक्त राजीव जाधव म्हणाले, ‘‘मराठी भाषेत आपण आपले विचार अधिक प्रभावीपणे मांडतो. जगातील मोठमोठे साहित्यिक आणि संशोधक यांनी आपआपल्या भाषेमध्ये प्रभुत्व निर्माण केले. त्यामुळे आपणही मराठी भाषेचा आग्रह धरायला हवा. मराठी भाषेतील ज्ञान अफाट आहे. मराठी भाषा नष्ट झाल्यास चांगल्या साहित्याचासुद्धा नाश होईल.’’