शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

‘पी अ‍ॅण्ड टी’तील सोसायट्यांत दिवसाआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2017 03:45 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेत २७ गावांचा पुन्हा समावेश झाल्यानंतर त्या गावांमधील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता.

अनिकेत घमंडी,डोंबिवली- कल्याण-डोंबिवली महापालिकेत २७ गावांचा पुन्हा समावेश झाल्यानंतर त्या गावांमधील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता. पण, ग्रामपंचायतच बरी होती, असे म्हणण्याची वेळ आता त्यांच्यावर आली आहे. येथील आधीच्या नांदिवली ग्रामपंचायतीमधील पी अ‍ॅण्ड टी कॉलनीत राहणाऱ्या २२ सोसायट्यांतील रहिवाशांना दीड-दोन वर्षांपासून पिण्याचा पाण्याचा प्रश्न भेडसावतो आहे. स्थानिक नगरसेवकासह महापालिका प्रशासनाने पाठ फिरवल्याने रहिवाशांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून प्रश्न सोडवण्यासाठी साकडे घातले आहे. तरीही, येथील पाणीप्रश्न सुटलेला नाही. उलट, तो दिवसेंदिवस भीषण होत आहे. गंगा, सर्वोदय पार्क, साई समर्थ, बालाजी दर्शन, श्रेया, गणराज, यमुना, सरस्वती आदी सोसायट्यांतील त्रस्त रहिवाशांनी यासंदर्भात एकत्र येत आवाज उठवला आहे. या ठिकाणी आता खाजगी तत्त्वावर दिवसाआड ११०० रुपये मोजून टँकरने पाणीपुरवठा केला जातो. २२ ते २५ सोसायट्यांना हा नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. राजेश खोत आणि ज्ञानेश्वर गाईगोळे यांनी ‘लोकमत’ला माहिती दिली. ते म्हणाले, आधी ग्रामपंचायत होती, तेव्हाही पाण्याचा प्रश्न होताच. आता तो तीव्र झाला आहे. नगरसेविका रूपाली रवी म्हात्रेंसह पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. पण, पालिका प्रशासनाने बघतो-करतो, अशी उत्तरे देत वेळ मारून नेली. नगरसेविका म्हात्रे यांनी वर्षभरापासून स्वखर्चाने आठवड्याला एक टँकर देण्यासाठी पुढाकार घेतला. पण, पाणीटंचाईसमोर त्यांचे साहाय्य तोकडे पडत आहे. पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवल्यावर तातडीने संबंधित विभागाला सूचना देण्यात आल्या. सूत्रे हलली. पण, ‘पुन्हा ये रे माझ्या मागल्या’ची स्थिती झाल्याचे ज्ञानेश्वर म्हणाले. ही समस्या असूनही गंगा सोसायटीने पाण्यासह अन्य करांबाबतचे ८६ हजारांचे बिल भरले. पाणीपट्टी भरूनही ही अवस्था असेल, तर बिल न भरणे योग्य आहे का? जे नियमाने वागतात, त्यांच्या वाट्याला हा अन्याय का, असा सवाल त्यांनी केला.येथील पाणीसमस्या लवकरच निकाली निघेल. पुढील शुक्रवारपर्यंत मीटर टाकण्याची कामे होतील. त्यानंतर, चांगल्या पद्धतीने पाणी मिळेल. त्या कामासाठीच मी ई-प्रभागात ठाण मांडले आहे. - रवी म्हात्रे, नगरसेविका,रूपाली म्हात्रेंचे पतीसोसायट्यांनी माझ्याशीही संपर्क साधला आहे. त्यांची अडचण रास्त आहे. मी देखील तेथे टँकरने पाणी दिले होते. आठवडाभरात त्यांना न्याय न मिळाल्यास महापालिकेवर रहिवाशांचा मोर्चा काढण्यात येईल. - भाऊसाहेब चौधरी, शिवसेना शहरप्रमुख-डोंबिवली