शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत दररोज २३ दुर्घटना

By admin | Updated: May 18, 2017 03:27 IST

गजबजलेल्या मुंबई शहरात छोटे-मोठे अपघात होत असतात. मात्र, या अपघातांच्या संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. अग्निशमन दलाने सादर केलेल्या आकडेवारी नुसार

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गजबजलेल्या मुंबई शहरात छोटे-मोठे अपघात होत असतात. मात्र, या अपघातांच्या संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. अग्निशमन दलाने सादर केलेल्या आकडेवारी नुसार, जानेवारीच्या महिन्यात दिवसाला सरासरी २३ दुर्घटना घडल्या आहेत. यामध्ये आठ जणांचा मृत्यू व ३३ जण जखमी झाले आहेत.देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात दुर्घटनाही मोठ्या प्रमाणात होत आहेत. यामध्ये आग लागणे, घराची पडझड, वाहन अपघात, समुद्रात पडून मृत्यू होणे, अशा दुर्घटनांचा समावेश आहे. मुंबईकरांच्या निष्काळजीनेही दुर्घटनांचा धोका वाढला आहे. तसेच उत्तुंग इमारतींमध्ये आगीच्या दुर्घटना वाढल्या आहेत. जानेवारी महिन्यात मुंबईत एकूण ७०६ दुर्घटना घडल्या आहेत. अग्नी सुरक्षेचे नियम पाळण्यासाठी आणलेले कठोर नियम व कारवाईचा बडगाही हा धोका कमी करू शकलेला नाही. अग्निशमन दलाने १ ते ३१ जानेवारी २०१७ या महिन्यातील दुर्घटनांचा अहवाल स्थायी समितीला सादर केला आहे. या अहवालानुसार जानेवारी महिन्यात विविध प्रकारच्या ७०६ दुर्घटना घडल्या. त्यात ३३ जण जखमी झाले असून, आठ जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. १ ते १५ जानेवारी या कालावधीत आग लागणे, नाल्यात पडणे, वाहन अपघात, समुद्रात बुडणे, घराच्या भिंतीची पडझड अशा ३१२ दुर्घटना घडल्या आहेत. त्यात १६ जण जखमी झाले, तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या १६ लोकांमध्ये १५ पुरुष व एक महिला जखमी झाली आहे, तर तीन पुरुषांचा मृत्यू झाला आहे. या तीनपैकी एकाचा समुद्रात बुडून, तर दुसऱ्याचा नाल्यात पडून आणि तिसऱ्याचा घरात पडून मृत्यू झाला आहे. १५ ते ३१ जानेवारी या कालावधीत ३९४ दुर्घटना घडल्या आहेत. त्यामध्ये १७ जण जखमी, तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पाच मृत्यूपैकी एकाचा घरात मृत्यू झाला आहे. दुसऱ्याने आत्महत्या केली आहे. तर उर्वरित तिघांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. - अग्निशमन विभागाने दिलेल्या अहवालातील दुर्घटनांमध्ये आग लागणे, घराची पडझड, वाहन अपघात, समुद्रात पडून मृत्यू होणे, अशा दुर्घटनांचा समावेश आहे. त्यात मुंबईकरांच्या निष्काळजीनेही दुर्घटनांचा धोका वाढला आहे. तसेच उत्तुंग इमारतींमध्ये आगीच्या दुर्घटना वाढल्या आहेत. जानेवारी महिन्यात मुंबईत एकूण ७०६ दुर्घटना घडल्या आहेत.