शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

एसटीत लैंगिक छळाच्या दरवर्षी सरासरी ४0 घटना

By admin | Updated: November 24, 2015 02:31 IST

एसटीत दरवर्षी सरासरी ४0 घटना लैंगिक छळाच्या घटना घडत असून त्या विरोधात परिवहन मंत्री आणि एसटीचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्याकडे दाद मागणार असल्याचे महाराष्ट्र एसटी

मुंबई : एसटीत दरवर्षी सरासरी ४0 घटना लैंगिक छळाच्या घटना घडत असून त्या विरोधात परिवहन मंत्री आणि एसटीचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्याकडे दाद मागणार असल्याचे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या राज्य महिला संघटक शीला नाईकवाडे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. एसटी कामगार संघटनेतर्फे राज्यव्यापी महिला कामगार मेळावा २५ नोव्हेंबर रोजी गिरगावातील भारतीय विद्याभवन येथे होणार आहे. या मेळाव्यात लैगिंक छळ आणि महिला कर्मचाऱ्यांविषयीच्या अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. राज्यातील एसटी महामंडळात विविध विभागात कार्यरत असणाऱ्या जवळपास एक हजार महिला कर्मचारी या मेळाव्यात सहभागी होतील, असे नाईकवाडे यांनी सांगितले. गरोदर महिला वाहकांना गरोदरपणात हलके काम किंवा टेबलवर्क देण्यात यावे, महिला कामगारांना स्वच्छ व पुरेशी विश्रांतीगृहे, स्वच्छतागृहे व पिण्याचे पाणी इत्यादी सोई मिळत नाहीत त्या पुरविण्यात याव्यात, लैंगिक छळ तक्रार निवारण समितीकडे आलेली प्रकरणे नि:पक्षपातीपणे हाताळण्यात यावीत व दबावतंत्राचा वापर होऊ नये, महिला वाहकांवर प्रवाशांकडून वाढत्या प्रमाणात होणारे हल्ले, शिवागिळ याविरोधात कारवाई व्हावी, महिला वाहकांना रात्रपाळीची कामगिरी देण्यात येऊ नये यासह अन्य मागण्या या मेळाव्यातून केल्या जाणार आहेत. यानंतर दोन ते तीन दिवसांत परिवहन मंत्री आणि एसटीचे अध्यक्ष दिवाकर रावते यांची भेट घेण्यात येणार आहे.