शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

एव्हरार्ड नगरात खड्ड्यांचे साम्राज्य

By admin | Updated: August 1, 2016 02:22 IST

एकीकडे मुंबई महानगर पालिका शहरात काही प्रमाणातच खड्डे असल्याचा दावा करत आहे.

मुंबई : एकीकडे मुंबई महानगर पालिका शहरात काही प्रमाणातच खड्डे असल्याचा दावा करत आहे. मात्र शहरातील प्रत्येक रस्त्यांवर सध्या खड्डेच पाहायला मिळत असल्याने रहिवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. चुनाभट्टीच्या एव्हरार्ड नगर परिसरात तर सात ते आठ फूट लांबीचे खड्डे असल्याने त्याचा त्रास या परिसरात येणाऱ्या रुग्णांना तसेच रहिवाशांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. याबाबत अनेक तक्रारी देऊनही पालिका प्रशासन याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप रहिवासी करत आहेत.सायन अथवा चेंबूरवरुन सोमय्या रुग्णालयात व प्रमुख स्वामी आय हॉस्पिटलमध्ये जाण्याकरिता वाहन चालकांना सायनच्या पुलाखालून विळखा घालत एव्हरार्ड नगर मधून जावे लागते. त्यामुळे या सर्व्हिस रोडवर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. वर्षभरापूर्वीच महापालिकेने या रस्त्याची डागडुजी केली होती. मात्र यावर्षी पाऊस सुरु होताच या रस्त्यांची अगदीच चाळण झाली आहे. या रस्त्यावर सात ते आठ फूट लांब आणि दीड ते दोन फूट खोल खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर सध्या मोठी वाहतूक कोंडी होत असते. त्यातच या खड्ड्यांमुळे वाहनांचे देखील मोठे नुकसान होत आहे.पालिका कंत्राटदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचा माल वापरल्याने या रस्त्याची अवस्था वर्षभरातच दयनीय झाली आहे. या रस्त्याच्या दुरावस्थेचा सर्वाधिक त्रास सोमय्या रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांना होत आहे. गरोदर महिलांना प्रसुतीसाठी रुग्णालयात नेताना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. हे खड्डे तब्बल दीड ते दोन फूट खोल असल्यामुळे रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता आहे. दुचाकीस्वारांचेही या खड्ड्यांमुळे हाल होतात. त्यामुळे हा रस्ता पालिकेने तत्काळ दुरुस्त करावा, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)