शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अखेर रस्ता झाला पूर्ववत

By admin | Updated: April 29, 2016 01:57 IST

रस्त्याची खोदाई केल्यानंतर राडारोड्यामुळे वाहतुकीस अडथळा होत असल्यासंदर्भात दि. २७ एप्रिलला लोकमतने वृत्त प्रसिद्ध केले होते.

रावेत : वाल्हेकरवाडी येथील मुख्य चौकातील जलवाहिनीसाठी रस्त्याची खोदाई केल्यानंतर राडारोड्यामुळे वाहतुकीस अडथळा होत असल्यासंदर्भात दि. २७ एप्रिलला लोकमतने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने दखल घेऊन मुख्य चौकातील रस्ता पूर्ववत केला. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.वाल्हेकरवाडी येथील मुख्य शिवाजी चौकात पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने जुन्या झालेल्या जलवाहिन्या बदलण्याकरिता खोदण्यात आलेले खड्डे व्यवस्थित न बुजविल्यामुळे राडारोडा रस्त्यावर तसाच पडून होता. त्यामुळे वाहने घसरून अपघात होत होते. नागरिकांना पायी चालणेसुद्धा अवघड झाले होते. भूमिगत जलवाहिन्यांचे काम पूर्ण होऊन काही दिवस उलटूनही या कामासाठी खोदण्यात आलेले रस्ते ठेकेदाराने व्यवस्थित बुजविले नव्हते. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता . परिसरातील जलवाहिन्या गेल्या अनेक वर्षांपासून जुन्या झालेल्या होत्या. त्या बदलाव्यात, अशी मागणी नागरिकांची होती. त्यामुळे काही दिवसांपूर्वी प्रशासनाने जुन्या वाहिन्या बदलण्याचे काम हाती घेऊन ते पूर्ण केले. परंतु, या भागातील खोदण्यात आलेले रस्ते पूर्ववत केले नव्हते. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत होता. रस्ते खड्डेमय बनल्याने वाहनचालक व नागरिकांना तेथून जाताना कसरत करावी लागत होती.या भागातील रस्त्यांचे गेल्या अनेक वर्षांपासून डांबरीकरण करण्यात आलेले नाही. त्यातच सर्वत्र रस्ते खोदून रस्त्याची चाळण झाली होती. मुख्य चौकातील जलवाहिनी वारंवार फुटत असल्यामुळे नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी कामे करण्यात आली. मात्र, यासाठी खोदलेले रस्ते पूर्ववत न झाल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले होते. रस्ते दुरुस्तीची मागणी नागरिक करीत होते. (वार्ताहर)