शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अखेर खासदारांना आली जाग

By admin | Updated: September 24, 2016 03:23 IST

स्कायवॉकचे काम दोन वर्षाहून अधिक काळापासून रखडल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच आतापर्यंत झोपलेले स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे जागे झाले

ठाणे : विटावा ते ठाणे या प्रस्तावित स्कायवॉकचे काम दोन वर्षाहून अधिक काळापासून रखडल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच आतापर्यंत झोपलेले स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे जागे झाले असून त्यांनी बुुधवारी जिल्हाधिकारी आणि मुख्य वनसंरक्षक के.पी. सिंग यांच्यासह कामाची पाहणी केली. यानंतर, या कामाला गती देण्याचे आश्वासन दिले. वन खात्याची अंतिम मंजुरी मिळून या कामाला येत्या दोन महिन्यांत सुरु वात करण्याच्या दृष्टीने ठाण्याचे जिल्हाधिकारी आणि मुख्य वनसंरक्षकांनी संयुक्त पाहणी करण्याची सूचनाही त्यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना या वेळी केली. विटावावासीयांच्या सोयीसाठी विटावा ते ठाणे असा स्कायवॉक प्रस्तावित आहे. मात्र, हे काम प्रदीर्घ काळापासून रखडले आहे. तसेच आता या कामाच्या एमएमआरडीएने २०.५८ लाखांच्या निविदा काढल्याचे वृत्त गुरुवारी लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच त्याची दखल घेऊन खासदार शिंदे यांनी गुरुवारी या भागाची पाहणी केली. दरम्यान, अन्य कुठलाही पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने विटावावासीय सध्या जीव धोक्यात घालून रेल्वेमार्गाच्या बाजूने ठाणे स्थानकाकडे येजा करतात. त्यामुळे या स्कायवॉकच्या कामाला लवकरात लवकर सुरु वात होणे गरजेचे आहे. मात्र, वन खात्याच्या मंजुरीअभावी कामाला सुरु वात झालेली नाही. यामुळे शिंदे यांनी आता याकामी पुढाकार घेतला आहे. (प्रतिनिधी)>वाहनचालकांसाठीही नवा पूल करणारया ठिकाणी पादचाऱ्यांसाठी स्कायवॉक होत असताना रेल्वेच्या प्रस्तावित पाचव्या आणि सहाव्या मार्गांच्या बाजूने हलक्या वाहनांसाठीही रेल्वेला समांतर पूल होणे गरजेचे आहे, असे शिंदे या वेळी म्हणाले. तसे झाल्यास विटावावासीयांचा जवळपास ३ किमीचा फेरा वाचणार असून कळवा पुलावरील वाहतुकीचा ताणही त्यामुळे कमी होऊ शकतो. त्यामुळे एमएमआरडीएकडे तशी मागणी करणार असून कोणत्याही परिस्थितीत या पुलाला मंजुरी मिळवू, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.